डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
सोलापूर : शहरातील लकी चौकातील शिवपार्वती लॉजमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणात माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर आरोप केला जात आहे. त्यांच्याविरुद्ध चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन, मनोहर सपाटे (रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडिता ही शेतीच्या वादातून दाखल असलेल्या न्यायालयातील केसच्या कामासाठी १४ जून रोजी सोलापुरात आली होती. त्यावेळी राहण्यासाठी त्या महिलेने लकी चौकातील शिवपार्वती लॉजमधील रुम बुक केली होती. लॉजच्या व्यवस्थापनाने पीडितेस रूम नं. २०२ ही दिली होती. त्यानंतर दोन दिवसानंतर पीडितेला रुम नं. २०५ देण्यात आली.
पीडिता ही लॉजबाहेर जाताना लॉजचे मालक मनोहर सपाटे याने पीडितेला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड देऊन पीडितेचा मोबाईल नंबर घेतला होता. १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या रूम नं. २०५ चा दरवाजा कोणीतरी बाहेरून वाजवल्याने पीडितेने दरवाजा उघडला असता बाहेर उभा असलेला मनोहर सपाटे हा रुममध्ये जबरदस्तीने घुसला व त्याने दरवाजाची आतून कडी लावून पीडितेच्या मनाविरुध्द अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.
त्यानंतर २४ जून रोजी सपाटे याने पीडितेच्या मोबाईल फोनवर कॉल करून रूम नं. ३०७ मध्ये बोलावले. पीडिता ही सायंकाळी रूममध्ये गेली असता सपाटे याने पुन्हा तिच्या इच्छेविरुध्द तिचा विनयभंग केला. यावेळी मात्र पीडितेने ही सर्व घटना तिच्याकडील मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ शूट केली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात सपाटे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.