
Crime News: अहमदनगरमध्ये घडली धक्कादायक घटना; तब्बल ९ जणांनी अल्पवयीन मुलासोबत केले असे काही की...
अहमदनगर: राज्यात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळत आहेत. बदलापूरची घटना झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळल्याचे दिसून आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकाऊंटर करण्यात आला आहे. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत लैंगिक अत्याचारच्या घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत. यावर पोलिस देखील कडक कारवाई करत आहेत. मात्र आता असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यांतील श्रीरामपूर भागात लैंगिक आत्याचाराची घटना घडली आहे. ११ वर्षीय मुलांवर लैंगिक आत्याचाराची घटना घडली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलावर लैंगिक आत्याचाराची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तब्बल ९ जणांनी ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कृत्य करणारे देखील अल्पवयीन असल्याचे समजते आहे.
या अत्याचार प्रकरणात पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ११ वर्षीय मुलास धमकावून त्याच्यावर ९ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. मात्र यामुळे राज्यात लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.
पुण्यात देखील वाढले अत्याचारांचे प्रमाण
घरकाम करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला काम देण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर नेहून त्याठिकाणी लिंबू सरबतातून गुंगीचे ओैषध देऊन लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कोथरुड भागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सोनाली नावाच्या महिलेवर अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे.
तक्रारदार ज्येष्ठ महिला दांडेकर पूल भागात राहायला आहेत. त्या घरकाम करतात. दरम्यान संबंधित महिलेची व त्यांची घटनेच्या आधी तीन दिवसांपुर्वीच ओळख झाली होती. या महिलेने त्यांना घरकाम मिळवून देते, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, तक्रारदार या २७ सप्टेंबर रोजी कोथरुड येथील मिर्च मसाला हॉटेलसमोरुन निघाल्या होत्या. त्यावेळी महिला तेथे आली.तिने तुम्हाला काम मिळवून देते, असे तिने सांगितले. नंतर त्यांना भेकराईनगर येथील एका फ्लॅटवर नेले. त्याठिकाणी लिंबू सरबत पिण्यास दिले. लिंबू सरबतात गुंगीचे ओैषध टाकल्याने महिलेला गुंगी आली. तेव्हा त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन महिला पसार झाली.