absconded after burglary and embezzlement of cash servant arrested performance of mahatma phule chowk police kalyan read where the crime incident took place nrvb
कल्याण : कल्याणच्या (Kalyan) महात्मा फुले चौक पोलिसांनी (Mahatma Phule Chowk Police) घरफोडी (Burglary) करणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणुन ६ लाख २४ हजार ३५५ रु किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलइडी टि.व्ही, रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच ४५ लाख ४ हजार रोख रक्कमेचा अपहार करून पळून गेलेल्या नोकरास (Servent) त्याच्या साथीदारासह राजस्थान (Rajasthan) येथून अटक (Arrest) करून ४१ लाख १५ हजार रोख रक्कम जप्त करत एकुण ४७ लाख ३९ हजार ३५५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे.
२१ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान कल्याण पश्चिमेतील ६५ वर्षीय महिलेच्या घरातील एकूण ५ लाख ७९ हजार ५०५ रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलईडी टि.व्ही, रोख रक्कम व इतर मालमत्ता चोरी केल्याची घटना घडली होती. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथक तयार केली. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सतत ५ दिवस अथक परिश्रम घेवून, सापळा रचून, वॉच करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवून जावेद अख्तर मोहमद सलीम शाह (२७) याला भिवंडी येथून ताब्यात घेतले.
[read_also content=”केरळ ट्रेन अग्निकांडाचा दहशतवादाशी संबंध? युपीच्या बुलंदशहरमध्ये संशयिताची चौकशी, NIA टीम दाखल https://www.navarashtra.com/crime/kerala-burning-train-update-fire-suspect-detained-from-up-bulandshahr-nia-team-reaches-kannur-nrvb-381046.html”]
त्याच्याकडे तपास केला असता, त्याने हा गुन्हा व त्या व्यतिरिक्त रामबाग कल्याण प. येथे दोन घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे. आरोपीकडून ३ घरफोडीच्या गुन्हयातील एकूण ६ लाख २४ हजार ३५५ रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलइडी टि.व्ही., रोख रक्कम हस्तगत करून हे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच २५ मार्च रोजी ५१ वर्षीय सराफा व्यवसायीकाच्या भावाच्या मुलाने त्यांच्याकडे काम करीत असलेला आरोपी रमेश झुंजाराम देवासी याला ४५ लाख ४ हजार रू रोख रक्कम असलेली बॅग बँकेत भरणा करण्यासाठी विश्वासाने सोपविली असता या रक्कमेचा अपहार करून पळून गेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथके तयार केली. आरोपीची माहीती मिळवून रमेश झुंजाराम देवासी यास त्याचा साथीदार जगदीश भोलाराम देवासी याने मदत केल्याचे निष्पन्न झाले.
[read_also content=”४ एप्रिल २०२३, मेष आणि मिथुन राशीसाठी शुभ दिवस, आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल वाचा https://www.navarashtra.com/lifestyle/todays-daily-rashibhavishya-4-april-2023-good-day-for-aries-and-gemini-read-horoscope-in-marathi-nrvb-380756.html”]
त्यानुसार एक पथक राजस्थान व एक पथक गुजरात येथे रवाना झाले होते. तपास पथकांनी आरोपी जगदीश भोलाराम देवासी यास राजस्थान येथून अटक केली असून गुन्हयातील अपहार केलेले ४१ लाख १५ हजार रू. रोख रक्कम हस्तगत केली आहे. या गुन्हयातील पुढील तपास सपोनि दिपक सरोदे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अशोक होनमाने, पोनि (गुन्हे) प्रदीप पाटील, पोनि श्रीनिवास देशमुख, सपोनि. दिपक सरोदे, पोउपनि तानाजी वाघ, सपोउपनि विजय भालेराव, पोहवा जाधव, पोना कांगरे, पोहवा भाट, ठिकेकर, चित्ते, हासे, भोईर, पोना मधाळे, पोशि गामणे, थोरात, दिपीका पडवळ यांनी केली आहे.