कल्याण पूर्वेत मराठी भाषा न येण्याच्या कारणावरून ४ नशेत तरुणांनी खानावळीत तोडफोड केली आणि दोन नेपाळी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहेत.
कल्याणच्या वरप गावात चारित्र्याच्या संशयातून संतोष पोहळ यांनी पत्नी विद्या हिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने हायप्रोफाईल सोसायटी हादरली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झोपलेल्या मजुराच्या कुटुंबातून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी झाली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या ६ तासांत बाळाची सुटका केली. आरोपी आत्या-भाचा अटकेत असून तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर तिचा व्हिडीओ तयार केला आणि तो आपल्या मित्रतांना पाठवला.
कल्याण परिमंडळ कल्याण परिमंडळ 3 च्या पथकाने तब्बल 1800 किमी प्रवास करून आंतरराज्य गांजा तस्कर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या ऑपरेशन पोलिसांनी तब्बल 22 दिवस जंगलात मोहीम राबवत 13…
कल्याण आधारवाडी चौक परिसरातील मनोमेय रुग्णालयात डॉक्टरांची हलगर्जीपणा समोर आली आहे. 10 वर्षाच्या मुलाला टायफाईड आणि निमोनियाची लागण झाला होती. मात्र त्याला दुसऱ्याच आजाराची औषध देण्यात आली.
कल्याणमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कल्याणमधील ४ वर्षीय मुलीचा अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात तिच्या मावशी आणि पतीला अटक करण्यात आली आहे. आठ महिन्यानंतर पोलिसांनी आरोपींना रायगड येथून अटक…
बाजारपेठ परिसरात मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या चोराला जेरबंद करण्यात पोलीसांच्या हाती यश आलं आहे. कामगाराला बेदम मारहाण करुन करुन त्याची दुचाकी आणि मोबाईल लूबाडणाऱ्या चाेरट्याला बाजारपेठ पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली…
कल्याणमध्ये एका पीडित तरुणीच्या मदतीसाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड पुढे आले आहेत. गायकवाड यांनी संबंधित तरुणीला ₹50,000 आर्थिक मदत केली असून, तिला खाजगी रुग्णालयात नोकरीची संधी दिली आहे.
डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणिलाल एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
केडीएमसी रुक्मिणी बाई रुग्णालय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आज रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.
केवळ 1000 रुपयांची रक्कम नसल्यामुळे रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने एका 35 वर्षीय महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे महिलेचे एक मुलगी आणि एक मुलगा अनाथ झाले आहे.
कल्याणमध्ये 35 वर्षीय महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून लिफ्टमध्ये कैद झाली आहे.
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने एक तरुणीची गळा आवळून हत्या केली. आरोपीने आणि तरुण मुलगी हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ राहत होते. दोघं मध्ये…
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कैऱ्या तोडण्यावरून वाद झाला आणि वादच रूपांतर हाणामारीत झाला. या हाणामारीत चाकूने वार करण्यात आला. यात एका मुलाचे वडील जखमी झाले आहे.
दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्स चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी-अमराठी वाद उफाळून आला होता. मारहाणही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा कल्याण ग्रामीणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.