Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atul Subhash: मर्द को भी दर्द होता है…! अतुल सुभाषसह प्रत्येकी 10 पैकी 7 पुरुषांची आत्महत्या, WHO चा धक्कादायक अहवाल

Atul Subhash Case: बंगळुरुत पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. या घटनेनंतर आता डब्ल्यूएचओकडून धक्कादायक अहवाल समोर आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2024 | 04:45 PM
अतुल सुभाषसह प्रत्येकी 10 पैकी 7 पुरुषांची आत्महत्या, WHO चा धक्कादायक अहवाल

अतुल सुभाषसह प्रत्येकी 10 पैकी 7 पुरुषांची आत्महत्या, WHO चा धक्कादायक अहवाल

Follow Us
Close
Follow Us:

Atul Subhash Case In Marathi: बेंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सुभाष यांनी आत्महत्येपूर्वी सुमारे 1 तास 20 मिनिटांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 24 पानांची सुसाईड नोटही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. या प्रकरणाची देशभर चर्चा सुरु आहे. यावेळी सोशल मीडियावर युजर्सकडून पुरुषांच्या हक्कांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे अतुलला न्याय देण्याची मागणी करत आहेत.

याचदरम्यान आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार जगभरात दरवर्षी 7 लाखांहून अधिक पुरुष आत्महत्या करत असल्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आत्महत्या हे जगभरातील मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. एकट्या भारतात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.

2038 पूर्वी उघडू नको…, अतुल सुभाषने 4 वर्षाच्या मुलासाठी दिलं गिफ्ट, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

दोन दशकांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतातील प्रत्येक 10 आत्महत्यांपैकी 6 किंवा 7 पुरुष आहेत. 2001 ते 2022 या कालावधीत दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्या 40 ते 48 हजार दरम्यान होती. तर याच काळात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या ६६ हजारांवरून १ लाखाच्या पुढे गेली आहे. तर 2022 मध्ये 1.70 लाखांहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 1.22 लाखांहून अधिक पुरुष होते. म्हणजे दररोज सरासरी ३३६ पुरुष आत्महत्या करतात. त्यानुसार दर साडेचार मिनिटाला एक माणूस आत्महत्या करत आहे.

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील आकडेवारीवरून पुरुष अधिक आत्महत्या करतात. डब्ल्यूएचओच्या मते, जगातील प्रत्येक 1 लाख पुरुषांपैकी 12.6 आत्महत्या करतात. त्याच वेळी, हा दर एक लाख महिलांमध्ये 5.4 आहे. NCRB च्या 2022 च्या अहवालात असे दिसून आले आहे की 30 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याची शक्यता जास्त आहे. यानंतर, 18 ते 30 वयोगटातील आणि नंतर 45 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्येच्या अधिक घटना घडतात.

आत्महत्येचे कारण काय?

प्रत्येक व्यक्तीच्या आत्महत्येमागे वेगवेगळी कारणे असतात. नैराश्य आणि तणावामुळे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कधीकधी वैद्यकीय कारण देखील असते. याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या समस्येतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो तेव्हा तो आत्महत्या देखील करतो. यानुसार, लोक बहुतेकदा कौटुंबिक समस्या आणि रोगांमुळे (एड्स, कर्करोग इ.) आत्महत्या करतात. गेल्या वर्षी 32% आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे आणि 19% आजारपणामुळे झाल्या. 2022 मध्ये, 8,164 लोकांनी लग्नाशी संबंधित समस्यांमुळे आत्महत्या केल्या. त्यापैकी 52 टक्के पुरुष होते.

पण पुरुष जास्त आत्महत्या का करतात?

2011 मध्ये एक संशोधन करण्यात आले. यामध्ये महिलांपेक्षा पुरुष आत्महत्या का करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संशोधनात असे समोर आले आहे की, समाजात पुरुषांना अनेकदा शक्तिशाली आणि बलवान मानले जाते आणि त्यामुळे ते त्यांचे नैराश्य किंवा कामुक भावना इतरांसोबत शेअर करू शकत नाहीत आणि शेवटी ते कंटाळून आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.

दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, घरच्यांनी विरोध करताच उचललं हे पाऊल

Web Title: According to the who 12 6 out of every 100000 men in the world commit suicide atul subhash case in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 04:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.