संग्रहित फोटो
हेमराज रामदास चौरे (वय ५२, रा. अत्री) यांनी आरोपीला अडचणीच्या वेळी ५०० रुपये दिले होते. त्याबदल्यात आरोपीने त्यांच्या शेतात औषध फवारणी करून देण्याचे सांगितले होते. घटनेच्या दिवशी चौरे यांनी आरोपीला शेतात फवारणी करून देण्याबाबत विचारणा केली. मात्र, आरोपीने फवारणी करून देणार नाही आणि पैसेही परत करणार नाही, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
आरोपीने शिवीगाळ करीत चौरे यांच्या तोंडावर व नाकावर हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून बांबूच्या काठीने पाठीवर, डोक्याच्या मागील बाजूस, कानावर, डाव्या खांद्यावर आणि डाव्या पायावर मारहाण केल्याची तक्रार आहे. तसेच, पुढे पाहून घेण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस हवालदार गुलाबदास तुरकर करीत आहेत.
एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला
महाविद्यालयातील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एलएलबीच्या विद्यार्थ्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, तर त्याचा मित्रावरही चाकूने वार करुन गंभीर दुखापत करण्यात आली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी एन-६ सिडकोतील सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर घडला आहे. हर्ष राठोड, स्वप्नील राठोड, संकेत राठोड, सोन्या अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितमसिंग देविचंद बारवाल (वय २२, रा. भगतसिंगनगर, हसुल) याने फिर्याद दिली आहे.
Ans: गोंदिया जिल्ह्यातील अत्री येथे ५०० रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून मारहाणीची घटना घडली.
Ans: हेमराज चौरे यांनी धिरज बन्सोड याला अडचणीच्या वेळी ५०० रुपये दिले होते. त्याबदल्यात शेतात औषध फवारणी करण्याचे ठरले होते. मात्र, आरोपीने फवारणी करण्यास आणि पैसे परत देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.
Ans: हेमराज चौरे यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी धिरज वाल्मिक बन्सोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गुलाबदास तुरकर करीत आहेत.






