संग्रहित फोेटो
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी त्र्यंबक नाका परिसरात ही घटना घडली आहे. प्रेम हिरे हा तरुण या परिसरातून जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहित सोनवणे आणि पवन पाटील अशी या संशयितांची नावे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या नावांची आणि घटनेतील भूमिकेची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
हल्ल्यामागील कारणाचा शोध सुरू
प्रेम हिरे याच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संशयितांची चौकशी करून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर हल्ल्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






