संग्रहित फोटो
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल हा आई सायरा आणि वडील गुलाब पठाण यांच्यासोबत काटेजवळगा येथे राहत होता. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते सध्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी तात्पुरते वास्तव्यास होते. शनिवारी सोहेल शेतातील काम आटोपून घरी आला होता. रात्रीच्या सुमारास तो बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ बसून मोबाईल पाहत होता.
दरम्यान, रात्री आठच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सोहेलच्या आईला बाहेर बोलावून त्याला मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आईने घटनास्थळी धाव घेतली असता सोहेल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा होत्या.
कुटुंबीयांनी सोहेलला तातडीने खासगी वाहनातून निलंगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने सोहेलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सोहेल आणि महेबूब मुल्ला यांच्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी महेबूबच्या पत्नीशी सोहेल बोलत असल्याच्या संशयावरून वाद झाला होता. त्यावेळी गावातील नागरिक आणि नातेवाइकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. तसेच, यापुढे संशयावरून भांडण करणार नसल्याचे सांगत महेबूबने माफी मागितली होती, असे सोहेलच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे. या जुन्या वादातूनच हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
Ans: सोहेल गुलाब पठाण (वय २२).
Ans: निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास.
Ans: पत्नीशी बोलत असल्याच्या संशयातून झालेला जुना वाद हे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.






