माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि शार्प शूटर गुलाम अहमद यांना (Asad Ahmad Encounter) पोलीस चकमकी मृत्यू झाला. उमेश पाल हत्याकांडातील दोन्ही फरार गुन्हेगारांवर यूपी पोलिसांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. उमेश पाल खून प्रकरणात सहा शूटर्सचा सहभाग होता. गुलाम, गुड्डू मुस्लिम, साबीर, उस्मान उर्फ विजय चौधरी आणि अरमान, यापैकी दोघे आज STF ने चकमकीत मारले आणि दोन (अरबाज आणि उस्मान उर्फ विजय) आधीच मारले गेले आहेत.
[read_also content=”असदकडे आढळली घातकं शस्त्र! त्याच्याकडे ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर कुठून आलं? यातूनच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा गेला होता बळी https://www.navarashtra.com/crime/deadly-weapon-found-from-asad-police-investigating-from-where-did-he-get-the-british-bulldog-revolver-nrps-384775.html”]
मोठा मुलगा उमर लखनौ तुरुंगात आहे. नंबर दोन अली नैनी तुरुंगात आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची अल्पवयीन मुले बालसुधारगृह राजरूपपूरमध्ये आहेत.
झाशी येथे पोलिस चकमकीत मारला गेलेला असद हा अतिक अहमद यांचा तिसरा मुलगा होता. असता असदला लंडनमधून कायद्याचे शिक्षण घ्यायचे होते. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास स्कूल ऑफ लॉमध्येही अर्ज केला. त्याने पासपोर्टसाठी अर्जही केला होता. मात्र, अतिक आणि कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास पाहता पोलिसांनी पडताळणीला आक्षेप घेतला. त्यामुळे असदचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला.
वडील आणि दोन्ही भाऊ तुरुंगात गेल्यानंतर या टोळीला हाताळण्याचे आव्हान असदसमोर होते. हे तिघे तुरुंगात असल्याने असदला उमेश पाल खून प्रकरणात सहभागी व्हावे लागले. 24 फेब्रुवारी 2023 रोजी उमेशवर हल्ला झाला तेव्हा असदला कारमध्ये बसायचे होते, पण रागाच्या भरात तो कारमधून बाहेर आला आणि त्याने प्रचंड गोळीबार सुरू केला, अशीही माहिती आहे. हल्ल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर असदने आता वडिलांप्रमाणे गुन्ह्याचा मार्ग अवलंबल्याचे स्पष्ट झाले.