Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली दारू धोरण प्रकरणी, ED च्या सहाय्यक संचालकाला 5 कोटींची लाच घेताना अटक!

ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करणाऱ्या पवन खत्रीने मद्य धोरण प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल याच्याकडून ५ कोटी रुपयांची लाच घेतली होती. सीबीआयने खत्रीसह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 30, 2023 | 02:42 PM
दिल्ली दारू धोरण प्रकरणी, ED च्या सहाय्यक संचालकाला 5 कोटींची लाच घेताना अटक!
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली दारू धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) सीबीआयने (CBI) ईडीच्या अधिकाऱ्याला  (Assistant Director of ED )  ५ कोटींची लाच घेताना अटक केली आहे. ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करणार्‍या पवन खत्रीने दारू पॉलिसी प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून 5 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने खत्रीसह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”नीट हिजाब न घातल्याने शिक्षकाने 14 मुलींच केलं टक्कल, कुटुंबियांचा शाळेत एकच गोंधळ, शिक्षकाचं निलंबन! https://www.navarashtra.com/world/teacher-cut-hair-of-school-girls-for-not-wearing-hijab-properly-outrage-in-indonesia-nrps-450829.html”]

आजतकच्या वृत्तानुसार,  ईडीच्या विनंतीवरून सीबीआयने दोन आरोपी अधिकारी, सहायक संचालक पवन खत्री आणि अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, अटक करण्यात आलेला व्यापारी अमनदीप सिंग धल्ल, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ईडीच्या तक्रारीनुसार, असे समजले की अमनदीप सिंग धल आणि बिरेंद्र पाल सिंग यांनी दारू पॉलिसी प्रकरणात चालू असलेल्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान प्रवीण वत्स यांना 5 कोटी रुपये दिले होते. प्रवीण वत्स यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दीपक सांगवान यांनी काही पैशांच्या बदल्यात अमनदीप ढल यांना अटकेपासून वाचवण्यासाठी व्यवस्था करण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सांगवानने डिसेंबर २०२२ मध्ये ईडी अधिकारी पवन खत्री यांच्याशी वत्सची ओळख करून दिली.

असा झाला व्यवहार

दीपक सांगवान यांच्या आश्वासनावर आधारित, प्रवीण वत्स यांनी डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या सहा हप्त्यांमध्ये अमनदीप ढल यांच्याकडून 3 कोटी रुपये घेतले. दीपक सांगवान यांनी नंतर वत्सला सांगितले की, अमनदीप सिंग धल यांना आणखी दोन कोटी दिल्यास त्यांना आरोपींच्या यादीतून वगळले जाऊ शकते. प्रवीण वत्स यांनी ही बाब अमनदीप ढाल यांना सांगितली आणि व्यावसायिकाच्या प्रस्तावाला सहमती दिल्यानंतर त्यांनी वत्सकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या चार हप्त्यांमध्ये आणखी 2 कोटी रुपये घेतले.

प्रवीण वत्स यांनी ईडीला असेही सांगितले की अमनदीप सिंग धल्ल यांच्या वडिलांकडून मिळालेल्या पैशांपैकी त्यांनी दीपक सांगवान आणि पवन खत्री यांना 50 लाख रुपये दिले होते. पेमेंट रोख स्वरूपात केले गेले आणि डिसेंबर 2022 च्या मध्यात ITC हॉटेल, वसंत विहारच्या मागे पार्किंगच्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आले. मात्र, सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतरही अमनदीप ढल यांना ईडीने 1 मार्च 2023 रोजी अटक केली. अटकेनंतर प्रवीण वत्स यांनी दीपक सांगवान यांची भेट घेतली, त्यांनी सांगितले की अटकेच्या सूचना उच्च अधिकार्‍यांकडून आल्या आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर कोणताही प्रभाव नाही.

काम न केल्याने पैसे परत मागितले

दीपक सांगवान यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात अधिकाऱ्यांना सांगितले की, धल्लच्या कुटुंबाकडून घेतलेले पैसे परत करण्याच्या संदर्भात जूनमध्ये प्रवीणची भेट घेतली होती. अशा काही बैठकांमध्ये ईडीचे दोन आरोपी अधिकारी पवन खत्री आणि नितेश कोहरही उपस्थित होते.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि नंतर तपास यंत्रणेच्या संशयित अधिकाऱ्यांसह या प्रकरणातील आरोपींच्या घराची झडती घेतली. शोध पथकाला प्रवीण वत्स यांच्या घरातून २.१९ कोटी रुपयांची रोकड आणि १.९४ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने सापडले. तसेच त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते.

प्रवीण वत्स यांच्या घरी सापडले अनेक पुरावे

ईडीने प्रवीण वत्सच्या घरातून दोन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. तपास संस्थेने ईडी अधिकाऱ्यांसह या प्रकरणातील इतर आरोपींच्या घरातून इतर आक्षेपार्ह पुरावेही जप्त केले आहेत. आज तकला कळले आहे की दोन्ही आरोपी ईडी अधिकारी मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या टीमचा भाग नव्हते. अमनदीप सिंग धल यांच्याकडून 30 कोटी रुपये उकळण्याची त्यांची योजना होती. ईडीच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने आरोपींच्या जागेचीही झडती घेतली.

Web Title: Assistant director of ed arrested for taking 5 crore bribe in delhi liquor policy case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 09:55 AM

Topics:  

  • Delhi Liquor Policy Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.