
crime (फोटो सौजन्य: social media)
कोण आहेत प्रतिभा जाधव?
प्रतिभा जाधव या बदलापूर पूर्व मधील भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी असताना त्यांच्या मुलीने आक्षेपार्ह असे वीडियो बनवत एक रील शेयर केली आहे. त्यात तिने प्रभू श्रीराम यांच्यावर विधान केल आहे. या विधानाने या भागात चांगलच वातावरण पेटल आहे. पक्षाने सुद्धा मृणाल जाधव हिच्या वीडियोची दखल घेत तिच्या आईच्या पदाचा राजीनामा घेतला आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्वीट करत थेट इशारा दिला आहे.
चित्रा वाघ यांनी काय इशारा दिला?
बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष प्रतिभा जाधव आहे. त्यांच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, अश्या प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकार नाहीत.प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही.भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे.
पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
बदलापूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने पुन्हा आता मुलीच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
Ans: बदलापूर पूर्व येथे सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर तणाव निर्माण झाला.
Ans: संबंधित मुलीवर गुन्हा दाखल; पक्षाने तिच्या आईच्या पदावर कारवाई केली.
Ans: आक्षेपार्ह भाषेचा निषेध करत कठोर कारवाईची भूमिका जाहीर केली.