Taslima Nasreen
पाकिस्तानातील कराची (karachi terorriast attack) येथील पोलीस मुख्यालयावर (police headquarter)मोठा हल्ला झाला. जगभरातुन या हल्ल्याच्या विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, कट्टरवाद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (taslima nasreen) यांनी ट्विट करत पाकिस्तानच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तस्लिमा नसरीन यांनी ट्विट केले आहे की, पाकिस्तामध्ये ISIS ची गरज नाही, पाकिस्तानमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानी तालिबान पुरेसे आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
[read_also content=”दहशतवादी हल्ल्यानं हादरलं पाकिस्तान! तीन दहशतवाद्यांनी कराचीच्या पोलीस कार्यालयात स्वत:ला उडवलं, पोलिसासह तीन जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/crime/three-terrorists-attack-themselves-up-in-karachis-police-office-killing-three-including-a-policeman-nrps-370446.html”]
आपल्या स्पष्टवत्तेपणासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या तस्लिमा नसरीन केवळ एवढचं बोलुन थांबल्या नाहीत. तर, तस्लिमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, तालिबानने एखाद्या दिवशी पाकिस्तानवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. तस्लिमा नसरीनचे हे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा एक दिवसापूर्वी काही दहशतवादी पाकिस्तानातील कराची येथील पोलिस मुख्यालयात ग्रेनेड फेकण्यात आले होते. आज झालेल्या दहशदवादी हल्लात सहभागी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्या्त यश आलं आहे. सुमारे चार तास दहशदवादी आणि पोलिसांमझध्ये ही चकमक सुरू होती.
शाहराह-ए-फैसल भागात शुक्रवारी संध्याकाळी ७.१० मिनिटांनी हा हल्ला झाला. दहशतवादी कराची पोलिस मुख्यालयात (KPO) घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या या दहशतवाद्यांकडे प्रचंड स्फोटके आणि शस्त्रे होती, ज्याच्या सहाय्याने ते सतत हल्ले करत होते. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाकिस्तानी मीडिया आउटलेट जिओ न्यूजनुसार, रेंजर्स आणि पोलिस कर्मचार्यांसह चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 18 लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात या घटनेचा ‘तीव्र निषेध’ केला जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी निंदा पुरेशी नसून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, असं म्हण्टलं आहे. सायंकाळी 7:10 वाजता पोलिस प्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला सुरू झाला. त्यानंतर पोलीस आणि रेंजर्सनी मिळून 10:46 पर्यंत पाच मजली इमारत अनेक टप्प्यात रिकामी केली.
कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांच्या प्रवेशाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात असुन जगभरातुन त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तहरीक-ए-तालिबाननं या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या घटनेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून दोघांनी स्वत:ला उडवून दिले. मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहावर बॉम्बही बांधले होते. पण त्याला बॅाम्बस्फोट करण्याची करण्याची संधी मिळाली नाही.