अडीच लाख उकळून दोन दिवसात संसाराची राखरांगोळी (फोटो सौजन्य - iStock)
गेवराईतील एका तरुणाचे वय वाढत चालल्याने घरातील मंडळी लग्नासाठी मुलगी शोधत होती. मुलाच्या घरच्यांची चिंता पाहून जालन्यातील जाफ्राबाद येथील काही संशयित मध्यस्थांनी (दलालांनी) त्यांच्याशी संपर्क साधला. व्हॉट्सॲपवर मुलीचा बायोडाटा व फोटो पाठवून त्यांनी १ ऑक्टोबर रोजी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पाडला.
त्यानंतर “मुलीच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, त्यामुळे लग्नाचा सर्व खर्च अडीच लाख रुपये तुम्हालाच करावा लागेल,” अशी अट मध्यस्थांनी घातली. मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असतानाही, त्यांनी ऊसतोडणी मुकादमाकडून येत्या २०२६-२७ च्या हंगामाची उचल (ॲडव्हान्स) घेऊन पैशांची कशीतरी सोय केली.
५ ऑक्टोबर रोजी दलालांची टोळी कारने गेवराईत दाखल झाली. ठरल्यानुसार दोन वेगवेगळ्या फोन-पे खात्यांवर ५० हजार रुपये आणि उर्वरित २ लाख रुपये नगद स्वरूपात स्वीकारण्यात आले. एका स्थानिक ब्राह्मणाला बोलावून वैदिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आपल्या मुलाचे घर वसले या आनंदात कुटुंब होते; मात्र हा आनंद अवघे दोन दिवसच टिकला. लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा तगादा लावला. संशय आल्यावर कुटुंबाने दलालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ सुरू केली. हा सगळा प्रकार केवळ पैसे उकळण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
१९ ऑक्टोबर रोजी त्या मुलीने स्वतः पोलिसांत हजर राहून धक्कादायक माहिती दिली. तिचे वय २० वर्षे दाखवणारे बनावट आधार कार्ड दलालांनी तयार केले होते, मात्र प्रत्यक्षात ती अजून अल्पवयीन आहे. “मला धाक दाखवून जबरदस्तीने गेवराईत आणले आणि माझे लग्न लावून दिले,” अशी कबुली तिने दिली.
याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या फसवणूक रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना गजाआड करण्यासाठी पोलीस सध्या वेगाने तपास करत आहेत.
दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Ans: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून मध्यस्थ दलाल जालन्यातील जाफ्राबाद येथील होते.
Ans: दलालांनी ५० हजार रुपये ऑनलाईन (फोन-पे) आणि २ लाख रुपये रोख, असे एकूण अडीच लाख रुपये उकळले.
Ans: गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवून मुख्य आरोपी दलालांचा शोध सुरू केला आहे.






