बीडच्या परळीत गर्भवती महिलेच्या पोटात मृत बाळ तब्बल २२ तास राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी सोनोग्राफी न करता उपचार केल्याचा आरोप असून आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली आहे.
या हल्ल्यात एकूण अमित कांताप्रसाद तिवारी आणि सुजय गोकुळसिंग चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर राहुल हजारी, अमित सद्देवाल आणि मोहन रहिकवाल हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत…
माजलगावमधील अकरावी इयत्तेत शिकणारी एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून बेकर्स लॉज कॅफेमध्ये गेली होती. तिथे तिच्या मैत्रिणीऐवजी, तिच्याच कॉलेजमधील अब्दुल नावाचा एक विद्यार्थी आधीच उपस्थित होता.
बीडच्या बेलुरा गावात 19 वर्षीय तरुणाची मित्रांनी संगनमताने चाकूने भोसकून हत्या केली. पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद झाल्याने हा प्रकार घडला. एक आरोपी ताब्यात, इतरांचा शोध सुरू आहे
बीडच्या केज तालुक्यात पत्नीला फोन केल्याच्या कारणावरून पतीवर लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी धमकीही दिली. जखमी पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे.
बीड जिल्ह्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या. केजमध्ये तरुणाने घरात घुसून मुलीशी लग्नासाठी धमकी दिली, तर अंबाजोगाईत 28 वर्षीय महिलेवर दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप आहे. दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल…
बीडच्या अंबाजोगाई येथे 28 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीने नंतर धर्मांतराची अट घालत धमक्या दिल्या. तक्रारीवरून गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे 30 वर्षीय रेल्वे पोलीस अधिकारी नितीन ढगे यांनी भाड्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आठवड्यावर लग्न असताना घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून कारण अद्याप अस्पष्ट…
बीडमध्ये तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत सात जणांनी एका तरुणावर कुऱ्हाडी व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल असून जखमीवर ICU मध्ये…
बीडच्या केजमध्ये सावत्र पित्याने 13 वर्षीय मुलीवर आई नसताना लैंगिक अत्याचार केला. मुलीने आईला सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
बीडच्या केज तालुक्यात चुलत चुलत्याने अत्याचार केल्यानंतर अल्पवयीन मुलीने विषप्राशन केले. छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
बीडच्या केज तालुक्यात छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आरोपी तरुण तिचा सतत पाठलाग करत होता. तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बीडच्या अंबाजोगाईतील २४ वर्षीय महेश भणगेने मित्रांच्या वाढदिवसाला न बोलावल्याने नैराश्यात विष प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबीयांना छतावर बेशुद्ध अवस्थेत सापडला; रुग्णालयात मृत घोषित.
बीडमध्ये 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळला. वर्षभरापूर्वी बालविवाह झाल्याचा संशय असून आत्महत्या की हत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील PG डॉक्टर डॉ. मंदार दाभाडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
बीडच्या कडा येथे आईवरील छळाला कंटाळून 19 वर्षीय मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारून हत्या केली. वडिलांना दारूचे व्यसन होते. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
बीडच्या मांजरसुंबा येथे प्रेमसंबंधांच्या वादातून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी मारहाण व बदनामी केल्याने तो मानसिक तणावात होता. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
केज तालुक्यातील शिरूरघाट येथे विहिरीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादातून हिंसक घटना घडली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुंदर सांगळे यांच्यावर चाकू हल्ला झाला. एक गंभीर जखमी असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बीडच्या केज तालुक्यात तारा चोरी करताना हायव्होल्टेज टॉवर कोसळून 2 चोरट्यांचा मृत्यू झाला. साथीदारांनी अपघाताचा बनाव करून मृतदेह परभणीत नेले, मात्र पोलिस तपासात संपूर्ण प्रकार उघड झाला.