Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! महिलेची छेड काढणारे औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन; पीडित महिलेच्या पतीलाही केली होती मारहाण

Aurangabad Crime : निलंबन असेपर्यंत विशाल ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील आदेश दिले आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 18, 2023 | 07:27 PM
मोठी बातमी! महिलेची छेड काढणारे औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन; पीडित महिलेच्या पतीलाही केली होती मारहाण
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : औरंगाबाद शहर (Aurangabad City) पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत होता.

तर बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याची हाक खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी दिली होती. अखेर गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्यात (Suspend) येत असल्याचा आदेश (Order) काढला आहे. तसेच निलंबन असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील आदेश दिले आहेत.

[read_also content=”दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तानचे होणार का 4 तुकडे? आर्थिक संकटात बांग्लादेशनंतर सिंधूदेश, पीओकेही स्वतंत्र होणार? मोदींना हवं ते घडणार का? https://www.navarashtra.com/world/will-pakistan-which-harbors-terrorists-become-4-pieces-will-demand-sindhudesh-pok-be-independent-after-bangladesh-in-financial-crisis-362683.html”]

एका ओळखीच्या व्यक्तीला घरी सोडण्याची विनंती करून, गाडीत बसल्यावर त्याच्या पत्नीचा ढुमे यांनी विनयभंग केला होता. एवढचं नाही तर पीडीत महिलेच्या पतीला बेदम मारहाण देखील केली होती. महिलेच्या तक्रारीवरून शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

मात्र अवघ्या चार तासात त्यांना जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्यावर गृहविभागाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. शुक्रवारी याविरोधात शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे वाढता संताप पाहता अखेर गृहविभागाकडून विशाल ढुमे यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबत गृहविभागाने लेखी आदेश देखील काढले आहे.

[read_also content=”मोठी बातमी! ट्विटर खरेदी करुन ‘कंगाल’ झाले एलन मस्क, ठरले जगातील सर्वाधिक संपत्ती गमावणारे व्यक्ती, आता ट्विटरच्या ऑफिसमधील फर्निचर विकण्याची वेळ… https://www.navarashtra.com/world/elon-musk-became-poor-by-buying-twitter-became-the-worlds-biggest-loser-now-time-to-sell-twitters-office-furniture-nrvb-362726.html”]

काय म्हटले आहे आदेशात?

गृहविभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सहायक पोलीस आयुक्त विशाल शरद ढुमे यांच्याविरूध्द पोलीस ठाणे सिटी चौक येथे गुन्हा नोंद क्रमांक 0027/2023 अन्वये गुन्हा दाखल आहे. विशाल ढुमे यांचेविरुध्द फौजदारी गुन्ह्याबाबतचे प्रकरण अन्वेषनाधीन आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 च्या पोटनियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून याद्वारे उक्त विशाल शरद ढुमे (सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर) यांना उक्त नियमाच्या कलम 4 (1) (क) च्या तरतूदीनुसार दि. १६ जानेवारी २०२३ पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. सोबतच शासन आणखी असेही आदेश देत आहेत की, जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तोपर्यंत विशाल ढुमे यांचे मुख्यालय पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर हे राहील.

ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलीस दलाचे आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. पोलीस आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल व त्या कारणासाठी वेगळ्या शिस्तभंगाच्या कारवाईस ते पात्र ठरतील, असे आदेशात म्हटले आहे.

[read_also content=”लखनऊत अश्लीलतेने गाठला कळस, भर रस्त्यात स्कूटीवर तरुण-तरुणीचं ओसंडून ऊतू जात होतं प्रेम, Video व्हायरल https://www.navarashtra.com/viral/lucknow-love-couple-romance-video-on-moving-scooty-viral-on-social-media-nrvb-362751.html”]

सर्वत्र आहे संतापाचे वातावरण!

आधीच शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच एका मोठ्या अधिकाऱ्याकडूनच महिलेची छेड काढण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच ढुमे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर ढुमे यांना निलंबित करण्याची देखील मागणी केली जात होती. यासाठी काही संघटनांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान अखेर ढुमे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Web Title: Big news aurangabad crime acp vishal dhume finally suspended for molesting woman victims husband was also beaten nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 07:26 PM

Topics:  

  • Aurangabad Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.