बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीवर आधीही दाखल आहे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
पुणे/अक्षय फाटक: बोपदेव घाट सामूहिक बलात्कारप्रकरणातील मुख्य सूत्रधार अख्तार शेख याला प्रयागराजमधून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २२ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अख्तार याच्यावर पुर्वीचा देखील एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. तो गुन्ह्यात सह आरोपी असून, त्या गुन्ह्यातून काही महिन्यांपुर्वी जामीनावर बाहेर आला होता.
पुणे पोलिसांनी दुसरा आरोपी शोएब उर्फ अख्तार बाबू शेख (२७) याला अटक केली आहे. तो सामूहिक बलात्कारातील मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच प्रथम पिडीत तरुणीवर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. प्रयागराजमधून ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलीस बुधवारी पुण्यात आले. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले. गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच त्याच्या अंगावरील कपड्यांचा शोध घ्यायचा आहे. त्यासोबतच त्याला फरार काळात कोणी मदत केली आहे का, आणि तो गुन्ह्यानंतर कोठे-कोठे राहिला. तसेच त्याची डीएनए चाचणी करायची असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, यासोबतच बोपदेव घाटातील मास्टर माईंड तसेच प्रयागराज येथून पकडलेल्या अख्तर शेखवर यापुर्वी देखील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद आहे. तो या गुन्ह्यात सह आरोपी आहे. गेल्या वर्षी (२०२३) अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी मुख्य आरोपी समीर याच्यासोबत अख्तर शेखवर भादवि कलम ३६३, ३७६ (२) (एन), ५०६, ३५४, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचाराच्या कलम ३, ४,८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात तरूणीकडून समीर अत्याचाराचे आरोप केले होते. तर अख्तरने विनयभंग केल्याचे म्हटले होते. तसेच अख्तर याच्या वकीलांनीही त्याने बलात्कारा सारखा कोणताही प्रकार केला नसल्याचे म्हणताना त्याला जामीन देण्याची मागणी केली होती. नंतर त्याची ५० हजारांच्या जात मुचलक्याववर जामीनावर सुटका केली होती. त्याला प्रत्येक तारखेला हजर राहण्यास सांगितले होते. न्यायालयाने २९ जुलै २०२४ रोजी जामीन मंजुर केला होता. जामीन मंजुर झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्याने बलात्कारासारखा गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा: Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण: लोकेशन कळू नये आरोपींनी म्हणून केले असे काही…
चंद्रकुमारची येरवडा कारागृहात रवानगी
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी चंद्रकुमार कनोजियाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दहा दिवसांपुर्वी बोपदेव घाटात फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करून आरोपी पसार झाले होते. सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी पोलिसांना चंद्रकुमारचा शोध लागला होता. त्यानंतर सोमवारी अख्तर शेखला प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अख्तर शेख हा या खूनाचा मास्टर माईंड असल्याचे आता समोर आले आहे. त्यासोबत त्याच्यावर यापुर्वीही लुटमार करताना अत्याचार केल्याप्रकरणी भिगवण येथे एक गुन्हा नोंद आहे. तर लुटमारीचे पुण्यासह, नांदेड, पुणे ग्रामीण अशा भागात ९ गुन्हे दाखल आहेत. तो वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन निर्जनस्थळी लुटमार करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने लुटमार करताना अत्याचार देखील यापुर्वी केले असल्याचे साथीदार सांगत आहेत. परंतु, त्या घटनांची नोंद झालेली नाही. त्यामुळे तो निर्ढावला होता.