बोपदेव घाट अत्याचार प्रकरण (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे/अक्षय फाटक: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले असून, उत्तरप्रदेशमधून या आरोपीला पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेने मध्यरात्रीपासून राबवलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला पकडण्यात यश मिळाले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या दुसऱ्या आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बोपदेव घाट सामूहिक बलात्कारप्रकरणात अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यांनी अत्याचार करण्यापुर्वी दारू तसेच गांजा प्यायला होता, अशी माहिती समोर आली आहे. तर, लोकेशन मिळेल यामुळे तिघांनीही मोबाईल फ्लाईट मोडवर टाकले होते. अख्तर शेख (वय २७, रा. नागपूर) असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. यापुर्वी पोलिसांनी शुक्रवारी चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, रा. डिंडोरी, रा. मध्यप्रदेश) याला शुक्रवारी अटक केली होती.
दहा दिवसांपुर्वी बोपदेव घाटात फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करून आरोपी पसार झाले होते. सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी पोलिसांना चंद्रकुमारचा शोध लागला होता. त्यानंतर सोमवारी अख्तर शेखला प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अख्तर शेख हा या खूनाचा मास्टर माईंड असल्याचे आता समोर आले आहे. त्यासोबत त्याच्यावर यापुर्वीही लुटमार करताना बलात्कार केल्याप्रकरणी भिगवण येथे एक गुन्हा नोंद आहे. तर लुटमारीचे पुण्यासह, नांदेड, पुणे ग्रामीण अशा भागात ९ गुन्हे दाखल आहेत. तो वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन निर्जनस्थळी लुटमार करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने लुटमार करताना अत्याचार देखील यापुर्वी केले असल्याचे साथीदार सांगत आहेत. परंतु, त्या घटनांची नोंद झालेली नाही. त्यामुळे तो निर्ढावला होता.
घटनेच्या दिवशी आरोपींनी आधी दारू प्यायली. नंतर गांजा पिला आणि बोपदेव घाटात गेले. दरम्यान, बोपदेव घाटात जाण्यापुर्वी त्यांनी मोबाईल फ्लाईट मोडवर टाकले होते. जेणेकरून आपले लोकेशन मिळू नये. तसेच, लुटमार करतानाही ते मोबाईल चोरत नसत. अख्तर शेखनेच या मुलीवर प्रथम अत्याचार केला. त्यानंतर इतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: बोपदेव घाट सामूहिक अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; दुसराही आरोपी सापडला
घटनेनंतर आरोपी पुण्यातच होते…
अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलीस आरोपींच्या शोधासाठी जंगजंग पछाडत असताना त्यांना ते सलग सात दिवस मिळाले नाही. परंतु, आता तीनही आरोपी अत्याचारानंतर देखील सलग तीन दिवस पुण्यातच फिरत होते. ७ ऑक्टोंबरला तिघेही पुन्हा एकदा भेटले आणि वेगवेगळे झाले. सात तारखेला अख्तर शेख नागपूरला गेला. त्याठिकाणी तो चार दिवस राहिला. परंतु, पोलिसांनी चंद्रकुमारला पकडल्यानंतर त्याने ११ ऑक्टोंबर रोजी नागपूर सोडले आणि तो प्रयागराज येथे गेला, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.