Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पीडित मुलीला दिलासा; ‘या’ योजनेंतर्गत मिळणार ५ लाखांची भरपाई

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2024 | 02:28 PM
Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पीडित मुलीला दिलासा; 'या' योजनेंतर्गत मिळणार ५ लाखांची भरपाई

Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पीडित मुलीला दिलासा; 'या' योजनेंतर्गत मिळणार ५ लाखांची भरपाई

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलीला ५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. बोपदेव घाट सामुहिक अत्याचारप्रकरणातील पिडीत तरुणीला ‘मनोर्धेय’  योजनेंतर्गत ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. भरपाई मिळण्याच्या अर्जास त्वरित मंजूर देत विधी सेवा प्राधिकरणाने तरुणीला दिलासा दिला आहे. अर्ज केल्यानंतर तो केवळ नऊ दिवसांत मंजूर करण्यात आला.

कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात असलेल्या टेबल पॉइंट येथे १५ दिवसांपूर्वी (दि. ३) मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीला गाठत त्यांना लुटण्यात आले. नंतर मित्राला ठार मारण्याची धमकी देत कोयता दाखवून सामूहिक अत्याचार केला होता. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून तरुणीने प्राधिकरणात अर्ज केला होता. प्राधिकरणाने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित अर्जाची पडताळणी केली. तसेच, जलदगतीने नुकसान भरपार्इ मंजूर केली आहे. आता यातील २५ टक्के रक्कम तरुणीला रोख स्वरूपात दिली जाणार आहे. तर ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी तिच्या नावे बॅंकेत मुदतठेव म्हणून ठेवली जाणार आहे. त्यातून येणाऱ्या व्याजातून तिला पुढील उपचार घेता येऊ शकतात. तर दैनंदिन खर्च भागविण्यासाठी तिला यातून मदत होणार आहे.

काय आहे ‘मनोधैर्य’ योजना?

अत्याचार झालेले बालक किंवा महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू केली आहे. प्राधिकरणात या योजनेची अंमलबजावणी होते. या योजनेंतर्गत अत्याचारातील पिडीतेला कमीत कमी ३० हजार रुपयापासून ते १० लाख रुपयापर्यंत भरपार्इ दिली जाते. अत्याचार झालेली मुलगी किंवा महिलेला पुन्हा त्याच प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागू नये यासाठी तातडीने आधार व धैर्य देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

हेही वाचा: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीवर आधीही दाखल आहे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुलीला लवकरात लवकर नुकसान भरपार्इ देण्याचे प्राधान्य होते. त्यामुळे कोणताही विलंब न करता प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार त्वरित अर्ज निकाली काढला. तरुणीने ११ ऑक्टोबर अर्ज केला होता, तो १९ ऑक्टोबरला निकाली काढण्यात आला. मनोर्धेयचे अर्ज तत्परतेने निकाली काढत झिरो पेंडन्सी तत्त्वावर प्राधिकरण कार्य करत आहे.
– सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

Web Title: Bopdev ghat case legal service autority give 5 lakh rs to victim girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 02:15 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime News: पुण्यातील किकी पद्मध्ये नामांकित कॉलेजच्या मुलांची फ्रेशर्स पार्टी; मनसेची अचानक धाड, 17-21 वयोगटातील मुलांना…
1

Pune Crime News: पुण्यातील किकी पद्मध्ये नामांकित कॉलेजच्या मुलांची फ्रेशर्स पार्टी; मनसेची अचानक धाड, 17-21 वयोगटातील मुलांना…

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
2

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
3

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
4

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.