Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द

राज्य सरकारने आज शासननिर्णय जारी करत सुनेत्रा पवार यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा केली. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आज (३ फेब्रुवारी) संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 03, 2026 | 03:39 PM
मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

Follow Us
Close
Follow Us:
  • उपमुख्यमंत्रीपदानंतर पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडेच
  • तीन मत्त्वाची खाती  सुनेत्रा पवारांकडे
  • ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालयात आपल्या दालनाचा पदभार स्वीकारणार
 

Sunetra Pawar guardian minister of Beed and Pune: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार, अशी चर्चा सुरू होत्या. या सगळ्या चर्चांदरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पालकमंत्रीपद कुणाला मिळणार, याबाबत प्रश्न उपस्थित होते. अखेर दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपवण्यात आले आहे.

राज्य सरकारने आज शासन निर्णय जारी करत सुनेत्रा पवार यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा केली. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आज (३ फेब्रुवारी) संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सरकारने वेगाने हालचाली केल्या आहेत.  (Sunetra Pawar News)

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन

१. मंत्रालयीन खात्यांचे वाटप

सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार यांच्याकडील बहुतांश खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, मात्र ‘अर्थ आणि नियोजन’ (Finance & Planning) हे महत्त्वाचे खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

२. पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद

अजित पवार यांचा पुणे जिल्ह्यावर मोठा राजकीय प्रभाव होता. हाच वारसा पुढे नेण्यासाठी सरकारने अधिकृत परिपत्रक काढून पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली आहे. पुणे हे राज्याचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र असल्याने या निवडीला मोठे राजकीय महत्त्व आहे.

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी? तारीख, सुतक काळाची वेळ नेमकी कधी, दिवसाच होणार

३. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद?

प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे केवळ उपमुख्यमंत्रीपदच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सोपवण्याबाबत पक्षांतर्गत एकमत झाले आहे. पक्षाला स्थिरता देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

४. मंत्रालयातून कामकाजाचा श्रीगणेशा

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालयात आपल्या दालनाचा पदभार स्वीकारणार आहेत. मंत्रालयातील अजित पवार यांच्या जुन्या कार्यालयातूनच त्या राज्यभरातील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आणि प्रशासकीय कामांना गती देण्याचे काम करतील.

 

Web Title: Maharashtra politics sunetra pawar guardian minister of beed and pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Beed
  • Maharashtra Politics
  • Pune
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
1

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
2

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
3

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप
4

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.