मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांवर सीबीआयकडून गुन्हे दाखल

सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवर छापेमारी सुरू केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
Sanjay Pandey
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस (Former Mumbai Police Commissioner) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या अडचणी दिवसेंदिवस (Difficulties) वाढताना दिसत आहे. सीबीआयने (CBI) पांडे यांच्याविरोधात नवीन तीन गुन्हे (File Charge) दाखल केले आहेत. एनएससी घोटाळ्याप्रकरणी (NSC Scam) केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पांडे यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवर छापेमारी (Raid) सुरू केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.