मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात (Mumbai Central jail) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कारागृहातच संशयित आरोपीवर पाच कैद्यांनी हल्ला केल्याची गंभीर प्रकार घडला आहे. (Accused was attacked by five inmates) उमेश कोल्हे खून प्रकरणातील (Umesh Kolhe murder case) संशयित आरोपी शाहरुख पठाण (Shahrukh pathan) या संशयित आरोपीवर 5 कैद्यांनी हल्ला केला आहे. ही घटना घडल्यानंतर सर्व संशयितांना वेगवेगळ्या बराकीत हलवण्यात आले आहे. हल्यावेळी सर्व संशयित आरोपी एकाच बराकीत होते. याप्रकरणी मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलिस (Mumbai N M Joshi police station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करताहेत.
[read_also content=”शिंदे गटातील आमदार, खासदारांच्या ‘सामना’ने जाहिराती नाकारल्या, ‘या’ कारणामुळं जाहिरातीस नकार https://www.navarashtra.com/maharashtra/samana-paper-rejected-advertisements-of-shinde-group-mla-and-mp-308657.html”]
दरम्यान, भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी पोस्ट केली होती. त्यानंतर अमरावती येथे 21 जून रोजी रात्री व्हेटर्नरी औषधी विक्रेता उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर या हत्या प्रकरणाचे नवनवीन कंगोरे व खुलासे समोर आले होते. उमेश कोल्हे खून प्रकरणी अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22), अतीब रशीद (22) शेख इरफान, मुदस्सीर अहमद (22), शाहरुख पठाण (25), आणि युसूफ खान बहादूर खान (44) यांना अटक केली आहे. त्यानंतर यातील काही आरोपींना मुंबईला आणण्यात आले आहे.