Sambhajinagar Crime News : मैत्री करण्यास नकार दिला, तरी मेसेजचा भडिमार! संभाजीनगरमध्ये तरुणीचा पाठलाग

संभाजीनगरमध्ये इन्स्टाग्रामवरून मैत्री करण्याचा आग्रह धरत १९ वर्षीय तरुणीला वारंवार मेसेज करून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नकार दिल्यानंतरही आरोपी तरुणाने तिचा पाठलाग केला. अखेर तरुणीच्या नातेवाइकांनी त्याला पकडून सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले.
Sambhajinagar Crime News ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )
Sambhajinagar Crime News ( फोटो सौजन्य सोशल मिडिया ) Sambhajinagar Crime News ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )
Published on: 
Updated on: 
  • पीडितेने बोलणे थांबविण्याचा प्रयत्न करीत मैत्री करण्यास नकार दिला

  • भेटीचे ठिकाण बदलत राहिला

  • अन् आरोपीला पोलिसांच्या केले स्वाधीन

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर इन्स्टाग्रामवरून ओळख वाढविण्याचा प्रयत्न, मैत्रीचा आग्रह आणि नकारानंतरही मेसेजचा भडिमार करुन २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करुन वारंवार आस देणाऱ्या तरुणाला पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३५ ते राजी ७.५६ वाजेच्या सुमारास घडली. विशाल शिवाजी मुरमुडे (२१, रा. हार्सुल सावंगी, मूळ रा. वाकोद, ता. कन्नड) असे पीडित तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून दुचाकी व मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकरणात बीएससीचे शिक्षण घेणारी १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता कुटुंबासह राहते.

पीडितेने बोलणे थांबविण्याचा प्रयत्न करीत मैत्री करण्यास नकार

तिची आई भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३५ वाजता पीडिता घरी असताना आरोपी विशाल मुरमुडे याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावरून तिला तू संभाजीनगरची आहेस का? असा मेसेज केला. पीडितेने त्याची ओळख विचारल्यानंतर त्याने अंदाजाने मेसेज केल्याचे सांगितले.

पीडितेने बोलणे थांबविण्याचा प्रयत्न करीत मैत्री करण्यास नकार दिला. मात्र, विशालने तिला मैत्री करण्याबाबत पुन्हा विचारणा केली. पीडितेने नकार दिल्यावर एवढा अॅटिट्युड का करतेस? असा मेसेज केला. त्यावर पीडितेने आस का देतो असे म्हणत त्याच्या मेसेजला उत्तर देणे बंद केले. त्यानंतरही रात्री ७.५६ वाजेपर्यंत त्याचे मेसेज सुरू होते.

भेटीचे ठिकाण बदलत राहिला

मेसेजदरम्यान विशालने खुलताबाद व वेरूळ येथे फिरायला जावू असे म्हणाला, त्यावर पीडितेने आई परवानगी देणार नाही, आपण इथेच भेट असे सांगितले. त्यानंतर विशालने शहरातच टीव्ही सेंटर येथील साई मैदानावर भेटण्यास बोलावले.

तरुणी तेथे गेल्यानंतर सुमारे तासा भराने विशालने पीडितेला फोन करून त्या ठिकाणी ओळखीची मुले असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर एम-२ रोडवरील एका खासगी रुग्णालयाजवळ येण्यास सांगितले.

अन् आरोपीला पोलिसांच्या केले स्वाधीन

पीडिता तेथे पोहोचली असता विशालने त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. पुढे जाऊन पाणीपुरी खाऊ, असे म्हणाला. त्याचवेळी पीडितेचे मावस आणि आते भाऊ तेथे आले. पीडितेने हाच तो तरुण इन्स्टाग्रामवरून मेसेज करीत असून, मैत्रीचा आग्रह धरतो आणि वारंवार त्रास देत पाठलाग करतो.

असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी विशालला त्याच्या दुचाकी व मोबाइलसह सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विमल पवार करित आहेत.