Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Crime: बांधकाम व्यावसायिक शरद राठोड यांचे अपहरण आणि जबर मारहाण; संंभाजीगरमध्ये नेमकं झालं काय?

शरद राठोड यांना लोखंडी रॉड, केबल वायर, पट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 08, 2025 | 08:42 AM
Sambhajinagar Crime: बांधकाम व्यावसायिक शरद राठोड यांचे अपहरण आणि जबर मारहाण; संंभाजीगरमध्ये नेमकं झालं काय?
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगर येथे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची आठवण करून देणारी घटना समोर आली आहे.  विधानसभा निवडणुकीचे उमेदवार संदीप शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक शरद राठोड यांचे अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण केली आहे. या हल्ल्यात राठोड यांच्या सहकाऱ्यालाही जबर मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे बीड पाठोपाठ संभाजीनगर शहरातील वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शरद राठोड यांना लोखंडी रॉड, केबल वायर, पट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात संदीप भाऊसाहेब शिरसाट (राहणार सुधाकरनगर), त्यांचा भाऊ आणि पोलिस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल आणि निखिलेश कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांवर वाढतोय ताण; एक लाख लोकसंख्येसाठी केवळ 172 कर्मचारी

शरद भवसिंग राठोड (वय ३३, रा. कुमावतनगर, देवळाई चौक) हे एक बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिजित ऊर्फ बंटी बर्डे (वय २८) याच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. बर्डे यांनी यापूर्वी संदीप शिरसाटकडे शासकीय बांधकामांच्या टेंडर प्रक्रियेत सहाय्यक म्हणून काम केले होते. मात्र, संदीपकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे बंटीने शरद राठोड यांच्या कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली.

६ एप्रिल रोजी पहाटे राठोड एका हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडत असताना, संदीप शिरसाट, त्याचा भाऊ व पोलिस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल आणि इतरांनी त्यांना “ऑफिसचं काम आहे” असं सांगत गाडीत बसवलं आणि त्यांना सुधाकरनगर येथील एका कार्यालयात नेलं. तेथे राठोड यांना जबर मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे,   संदीप शिरसाट यांनी शरद राठोड यांच्या  डोक्याला पिस्तूल लावून “तुला ठार मारून डोंगरात फेकून देतो” अशी धमकी दिली. त्यानंतर संदीपने राठोड यांना बंटी बर्डेला फोन करून “माझ्या दुचाकीचं पेट्रोल संपलंय, तू लवकर ये” असं सांगायला भाग पाडलं.

Devendra Fadnavis: प्रलंबित नागरी सेवा सुविधा प्रकल्प तातडीने

या प्रकरणी गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो सातारा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी मिथुन शिरसाट आणि त्याच्यासोबत चार ते पाच साथीदारांनी शरद राठोड यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले आणि त्यांच्यावर अत्याचार केला. जिवे मारण्याची धमकी देत त्यांना देवळाई चौक परिसरात जाऊन सोडण्यात आले.

दरम्यान, अभिजित बर्डेने सकाळी दहा वाजेपर्यंत राठोड यांची वाट पाहिली, मात्र आरोपींनी त्याला देखील सोडले नाही. अखेर राठोड घरी परतले. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलासोबत थेट पोलिस आयुक्तालय गाठले आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन संपूर्ण घडलेली घटना त्यांना सांगितली.

Web Title: Construction worker sharad rathod kidnapped and brutally beaten in sambhajigar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • Chatrapati sambhajiraje

संबंधित बातम्या

नवीन वाळू धोरण ठरतंय माफियांसाठीच फायद्याचं; जीवावर उदार होऊन महसूल पथकांकडून कारवाई
1

नवीन वाळू धोरण ठरतंय माफियांसाठीच फायद्याचं; जीवावर उदार होऊन महसूल पथकांकडून कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.