कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्... (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या प्रकरणामध्ये गणेश काळे (वय २१, रा. बीड) तसेच दिव्या निगोश (वय २०, रा. येरवडा) असे मृतदेह आढलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हा बीड जिल्ह्यातील आहे. तर दिव्या पुण्यातील विमानतळ भागातील आहे. दोघेही एका नामांकित रुग्णालयात नोकरीस होते. दोघेही लॅब टेक्नेशियन म्हणून काम करत होते. त्याठिकाणी त्यांची ओळख झाली होती.
महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे, नाहीतर…; साताऱ्यातील वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी
दरम्यान, मृत गणेश हा संगमवाडी परिसरातील दुर्गामाता मंदिरपरिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. शनिवारी (दि.29) रात्री तळेगाव परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला होता. त्याचदरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसाकंडून मुलीचा शोध घेतला जात होता. त्यादरम्यान, गणेशच्या रूमवर दिव्या हिचा देखील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल असे सांगितले आहे. मुलीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आहेत. त्यामुळे पोलिसाचा खून करून त्याने आत्महत्या केल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
‘दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडवू’; ‘त्या’ एका फोनने उडाली खळबळ
गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार
पुण्यात एका घटनेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपण पुरुषाने महिलेवर अत्याचार केला या घटना वाचल्या असतील. मात्र जर महिलेने पुरुषावर अत्याचार केला तर? तुम्हाला नवल वाटेल मात्र हे खर आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषाला वकील असल्याची बतवणी करत त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना आहे. संबंधित पुरुष हा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याच्या सोबत महिलेने अश्लील कृत्य करायचा प्रयत्न केला. त्याला गुंगीचं औषध देण्यात आल आणि त्या नंतर अत्याचार करण्यात आला. वारंवार त्याला पैशाची मागणी ही महिलेकडून करण्यात येत होती. मात्र या सगळ्या त्रासाला कंटाळून त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






