पुणे जिल्ह्यातील जेजुरी तालुक्यातील मावडी गावात दोन भावांमध्येच भांडण झाली. शेतात जायला वाट दिली नाही म्हणून सक्ख्या भावानेच दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत स्वतःच्याच भावाचा जीव घेतला.
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याचा समोर आला आहे.
Crime News Live Updates Marathi : दिवसभरातील गुन्हेगारीसंदर्भातल्या ताज्या घडामोडीचे अपडेट देत आहोत. महाराष्ट्र, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातले अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...
पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीवर संशय घेई आपल्याच घराचे स्पाय कॅमेरा लावला. तिचे अंघोळीचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्या आल्याच समोर…
पुण्यातून गुन्हेगारीच्या धक्कदायक घटना समोर येत आहे. दिवसाढवळ्या हाणामारी, मारहाण, कोयत्याची दहशत, घरफोडी अश्या अनेक घटना पुण्यात घडत आहे. आता पिंपरी चिंचवड मधून सशस्त्र दरोड्याचा थरार समोर आला आहे.
ढाब्यांवर दारू पिणे आणि विक्री करणे कायद्याने गुन्हा असून, अलीकडील काळात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासातून समोर आले आहे.
बिबवेवाडीत पुन्हा टोळक्याने दहशत माजवल्याची घटना घडली असून, अल्पवयीन मुलांनी कोयते उगारून वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात दहशत माजवत प्रचंड गोंधळ घातला.
पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, नऱ्हे व लोहगावमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. दोन्ही घटनांमधील चोरट्यांचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागलेला नाही.
बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
पुणे स्टेशन परिसरातील सोहराब हॉलजवळ भरधाव कारच्या धडकेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टुरिझम कंपनीच्या नावाखाली केरळ येथील ट्रीपचे आयोजन केल्यानंतर नागरिकांकडून बुकिंगचे पैसे स्वीकारले. मात्र, या नागरिकांना ट्रीपला न नेता दोन सख्या भावानी अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे शहरात अपघाताचे सत्र सुरूचं असून, सिंहगड रोड परिसरात वडगाव उड्डाणपुलावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे.