सौजन्य फोटो - सोशल मिडीया
दामिनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. शनिवारी सायंकाळी ती एसटी बसने कडावल येथे उतरून वर्दे येथील घरी पायी जात होती. याचदरम्यान कडावल-वर्दे रस्त्याजवळील ‘सायल्याचा व्हाळ’ परिसरात तिच्यावर हल्ला झाला. घटनास्थळी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
प्राथमिक तपासानुसार, दामिनी आणि साहिल यांची इन्स्टाग्रामवर सुमारे दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. साहिलने तिला प्रेमाची मागणी घातली होती; मात्र तिने नकार दिल्याने तो नाराज होता, अशी माहिती समोर आली आहे. या रागातूनच त्याने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीने मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी डिगस येथील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. मोटारसायकलच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढत पथक मठ येथे पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले.
कुडाळ पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हत्येत वापरलेले हत्यार, गुन्ह्यामागील नेमके कारण आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दोघांचेही मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.
महत्त्वाची नोंद: प्रकरणाचा तपास सुरू असून, एकतर्फी प्रेम हे हत्येमागील कारण असल्याची माहिती प्राथमिक तपासावर आधारित आहे.
Ans: प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला.
Ans: न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Ans: एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा प्राथमिक तपासातील संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






