महिला स्वच्छतागृहात गेली असता महिलेचा गुपचूप व्हिडीओ शूट करणाऱ्या एका इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. ही घटना बंगळुरु येथील इन्फोसिसमध्ये घडली आहे. अटक करण्यात आलेल्या इंजिनिअरच नाव नागेश स्वप्नील माळी असे आहे. तो इन्फोसिसमध्ये सिनियर असोसिएट म्हणून काम करतो. त्याला व्हिडीओ चित्रण करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
Thane Crime : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला हा संशय होता की नागेश तिचे व्हिडीओ काढत आहे, तिने नागेशला व्हिडीओ चित्रण करत असतांना त्याला पकडलं. त्यानंतर तिने तातडीने या विरोधात आवाज उठवलं. यावेळी बाकीचे कर्मचारी तिथे आले. त्यांनी नागेशला पकडलं आणि त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यात या महिलेचे व्हिडीओ होते. या सगळ्या प्रकारणानंतर एचआरकडून हे व्हिडीओ डिलिट करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागेशने फक्त या महिलेचं नाही तर इतर महिला कर्मचाऱ्यांचेही गुप्तपणे शूटिंग केल्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्याची चौकशी पोलीस करत आहे. नागेशचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. डिलिट केलेले व्हिडीओ पुनर्प्राप्त करण्यासाठी फॉरेन्सिक टीम काम करते आहे.
पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईला लोखंडी पाइपने मारहाण
बीड: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने आपल्या आईला लोखंडी पाईपने मारहाण केली. यामारहाणीमुळे ती जखमी झाली. मुलाने जखमी अवस्थेत आईला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आईने आपले प्राण सोडले. आपल्या पोटच्या गोळ्यानेच, आपल्याच मुलाने लोखंडी पाईपने केलेले आघात आईला सहन न झाल्याने या उपचारादरम्यान आईने जीव सोडला. मृत महिलेचे नाव सुवर्णमाला बांगर असं असून दत्त्ता बांगर असं आरोपी मुलाचं नाव आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Satara Crime: घरकाम करणाऱ्या बाईकडून दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून साडेदहा तोळे सोने हस्तगत