
crime (फोटो सौजन्य: social media)
हे प्रकरण कसे समोर आले ?
गेल्या आठवड्यात एका पार्टीदरम्यान आरोपी सोहम याने आपल्या मित्रांना काही अश्लील व्हिडीओ दाखवले होते. त्यांनतर या संपूर्ण सेक्स स्कँडलचा गौप्यस्फोट समोर आला. सोहमने पीडित मुलींना त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे. सोहमने जवळपास ३ वर्षात तब्बल २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. सोहम हा Madegal-Cacora येथील रहिवासी आहे. तो स्थानिक भाजप नगरसेवकाचा मुलगा आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
Nanded Crime: नांदेडमध्ये धावत्या दुचाकीला भीषण आग; तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू, ATSकडून तपास सुरू
अधिकृत तक्रार दाखल नाही
रविवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली. अद्याप याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही आहे. कारण अनेक पालकांनी सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीपोटी पुढे येण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक कुडचडे पोलीस ठाण्यात जमा झाले होते.
सखोल तपास सुरु
दक्षिण गोवा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीला कोठडीत घेण्यात आले आहे. आरोपीच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे दक्षिण गोव्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून अशा नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Ans: 22 वर्षीय सोहम नाईक हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
Ans: एका पार्टीत आरोपीने मित्रांना व्हिडिओ दाखवल्यानंतर प्रकरण समोर आले.
Ans: आरोपीला अटक करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.