Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘आधी मोबाईल हिसकावला अन् तरुणाला थेट 300 फूट…’; हडपसर पोलिसांकडून स्नॅचर टोळीला अटक

शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पादचाऱ्यांना अडवून, त्यांना धमकावून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 31, 2024 | 03:01 PM
Crime News: 'आधी मोबाईल हिसकावला अन् तरुणाला थेट 300 फूट...'; हडपसर पोलिसांकडून स्नॅचर टोळीला अटक

Crime News: 'आधी मोबाईल हिसकावला अन् तरुणाला थेट 300 फूट...'; हडपसर पोलिसांकडून स्नॅचर टोळीला अटक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याला ३०० फुटापर्यंत फरफटत नेणाऱ्या मोबाईल स्नॅचर टोळीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पादचारी तरुण जखमी झाला होता. चोरट्यांकडून गुन्ह्यातील मोबाईल तसेच त्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी आणखीही काही गुन्हे केल्याची शक्यता आहे.

मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. मुंढवा), रोहीत किरण वाणी (वय २१) व कृष्णा संजय वाणी (वय २०) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, निखील पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.

शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पादचाऱ्यांना अडवून, त्यांना धमकावून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या जात आहेत. दोन दिवसांपुर्वी हडपसरमधील डी.पी. रोडवरून पायी चालत जात असताना पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला होता. तरुणाने प्रतिकार केल्यानंतर या चोरट्यांनी तरुणाच्या हाताला धरून सुसाट दुचाकीवरून त्या तरुणाला २०० ते ३०० फुट फरफटत नेले होते. त्यानंतर त्याचा हात सोडून चोरटे पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास तपास पथक करत होते.

हेही वाचा: Pune Crime : पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना ठोकल्या बेड्या

सहाय्यक निरीक्षक सचिन कुदळे व कर्मचाऱ्यांनी या भागातील जवळपास १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यात संशयित दिसून आले होते. त्यानंतर पुढील सीसीटीव्ही तपासून तिघांची ओळख पटवली. यानंतर या तिघांना पकडण्यात आले. तिघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच,चोरून नेलाला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. या कारवाई एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे.

तर नागपूर गुन्हे शाखेनं ५० लाखांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज केलं जप्त केले आहे. या प्रकरणी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींकडून 550 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून नव वर्षाच्या पार्ट्यांवर नागपूर पोलिसांची बारीक नजर असणार आहे.

 

Web Title: Hadapsar police arrest chain snatching gang latest crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • pune crime news

संबंधित बातम्या

Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट
1

Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट

Pune Crime: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलिसांची भूमिका संशयास्पद
2

Pune Crime: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी
3

Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी

Pune crime news : एक कार चोर असाही! दुरस्तीसाठी दिलेल्या मोटारीसह गॅरेज चालकाचा पोबारा; गुन्हा दाखल  
4

Pune crime news : एक कार चोर असाही! दुरस्तीसाठी दिलेल्या मोटारीसह गॅरेज चालकाचा पोबारा; गुन्हा दाखल  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.