मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक भीषण अपघात झाला. एका मंदिराच्या जवळ ट्रकखाली चिरडून 12 जण ठार झाले. इतर अनेक जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील फुटेज समोर आले असून, पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ग्वाल्हेरमध्ये ही घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यावरील भाविक ट्रकखाली चिरडले गेले. कर्तव्यावर असलेले दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसएसपींनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सहा रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित लोकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. नवरात्रीदरम्यान मंदिराकडे जाणाऱ्या अनेक भाविकांना धान वाहून नेणाऱ्या एका ट्रकने चिरडले. ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंग यांनी सांगितले की, या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ३९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी १२ जणांना मृत घोषित करण्यात आले. जखमींमध्ये अपघाताच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांचा समावेश आहे.
ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक
ट्रक क्षमतेपेक्षा जास्त भरलेला होता. ट्रक अचानक आला आणि त्याने अनेक दुकाने व लोकांना चिरडले. अपघातात अनेकजण जखमी झाले तर काहीजण मृत्युमुखी पडले. या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्वाल्हेरचे एसएसपी काय म्हणाले?
ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंग म्हणाले, “ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. मोठ्या संख्येने भाविक शीतला माता मंदिराकडे जात होते. छिनोरहून येणाऱ्या रस्त्याला तीव्र उतार आहे. या मार्गावरून अवजड वाहनांना प्रवास करण्यास मनाई आहे. तरीदेखील हा ट्रक तेथून आला. मध्यरात्री सुमारे दीड वाजता धान्याने भरलेला एक ट्रक तिथे थांबवण्यात आला होता. ट्रकने पोलिसांचा बॅरिकेड तोडून वेगाने पुढे गेला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले, ट्रक अचानक उतारावरून खाली आला आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीला व दरवाजाला धडकला.






