Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinanath Mangeshkar Hospital Update: दीनानाथला महापालिकेचा पहिला दणका; २२ कोटी दोन दिवसात जमा करण्याचे रुग्णालयास आदेश

पुणे, रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन ने केल्यास या १८००२३३२१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 09, 2025 | 08:29 AM
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत 'तो' अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत 'तो' अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  मिळकत कराची थकबाकी असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास महापालिकेने जप्तीची नोटीस पाठविली आहे. मिळकत कराचे २२ कोटी रुपये दोन दिवसांत जमा करावी अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असे या नोटीस मध्ये नमूद केले आहे. गर्भवती महीलेच्या मृत्युमुळे पुणेकरांच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला आता महापालिकेने दणका दिला आहे.

गेल्या आठ वर्षापासून महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास नोटीस देण्यात आली आहे. अशा प्रकारची नोटीस दिली जाणार असल्याचे माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नुकतेच सांगितले होते. सदर रुग्णालयाने महापालिकेचा मिळकत कर थकविला असल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला होता.

दिल्ली, बिहारसह ‘ही’ राज्ये तरुणांना प्रशिक्षण देण्यात पिछाडीवर; परिषदही नाही स्थापन

न्यायालयाच्या आदेशानुसारच मिळकतकराची मागणी

एरंडवणा येथील सदर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या मालकीचे आहे. या मिळकतीवर २०२४ २५ या आर्थिक वर्षाअखेर सुमारे २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ इतका मिळकत कर थकबाकी आहे. या मिळकतीवर आकारण्यात आलेली कर आकारणी मान्य नसल्याने फाऊंडेशनने २०१६-१७ साली महापालिकेविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. सदर दाव्यात फाऊंडेशनने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या पन्नास टक्के रक्कम आणि इतर कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २०१४ ते २०२५ अखेर फाउंडेशनकडे एकुण २२ कोटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी आहे.

बैठकीनंतर दिले तोंडी आदेश

मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर मिळकतीवर जप्तीची कारवाई करावी असे तोंडी आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी मिळकत कर विभागाने फाउंडेशनला नोटीस बजावली आहे.

Swargate Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीसाठी पोलिसांचे प्रयत्न; कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

सक्ती केल्यास संपर्क साधावा

पुणे, रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन ने केल्यास या १८००२३३२१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास या १८००२३३२१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

८९ रुग्णालयांना नोटीस

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील ८६० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८९ रुग्णालयांमध्ये त्रुटी होत्या.

Web Title: Hospital ordered to deposit rs 22 crore from municipal corporation to dinanath within two days nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:29 AM

Topics:  

संबंधित बातम्या

महिलेच्या मृत्यू प्रकरणावर डीन धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्याकडे कर्मचारी म्हणून…”
1

महिलेच्या मृत्यू प्रकरणावर डीन धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्याकडे कर्मचारी म्हणून…”

Dinanath Mangeshkar News: दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर; कोट्यवधींची थकबाकी
2

Dinanath Mangeshkar News: दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर; कोट्यवधींची थकबाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.