परभणी: परभणीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिसरी मुलगी झाल्या पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात महिला गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे परभणीत एकच खळबळ उडाली आहे. मैना काळे असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेचा पती कुंडलिक काळे याला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री ही घटना घडली आहे. तीनही मुली झाल्याने पतीने रागाच्या भरात पत्नी मैना काळे यांना शिवीगाळ मारहाण केला. तिसरीही मुलगी झाल्याने रागाच्या भरात कुडंलिक काळे याने मैनाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात मैनाचे शरीर गंभीररित्या भाजले गेले. उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नीला जाळून तिची हत्या केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसांनी कुंडलिक काळेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची लागणार वर्णी? पक्षश्रेष्ठी करणार साईनगरी शिर्डीतून घोषणा
मैना काळे यांच्या बहीम भाग्यश्री यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिसरीही मुलगी कुंडलिक आपल्या पत्नीला मारहाण करत असे. भाग्यश्री यांनी अनेकदा त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्नही केला होता.पण कुडंलिकने मैना यांची हत्या केल्यानंतर भाग्यश्री यांनी कुंडलिक काळेविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुंडलिकने मैना यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळताना स्वत:च्या घराासोबतच घराशेजारील दोन दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. मैना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुंडलिक काळेला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
पाकच्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ! PoKमध्ये 200 SPG कमांडो तैनात
परभणीत हा प्रकार घडला असतानाच मुंबईतील बदलापुरात पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील एका 19वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला.
पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला.