Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू तस्कराकडून शिवीगाळ अन् धक्काबुक्की; तीन जणांवर गुन्हा दाखल

सोलापूरमध्ये अवैध वाळू घेऊन जाणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पेट्रोलिंगला गेलल्या महिला प्रांताधिकारी यांच्या अंगावर जात शिवीगाळ व धक्काबुक्की देखील केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2025 | 06:14 PM
Illegal sand smuggling truck on Solapur Pune Highway caught by female provincial officer

Illegal sand smuggling truck on Solapur Pune Highway caught by female provincial officer

Follow Us
Close
Follow Us:

कुर्डुवाडी : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंगला गेलल्या महिला प्रांताधिकारी यांच्या शासकीय वाहनाला आपले वाहन आडवे लावून महिला प्रांताधिकाऱ्यांच्या अंगावर जात शिवीगाळ व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना दि. २३ रोजी पहाटे १२.३० ते १.४५ वा सुमारास रोडवरील वरवडे टोल नाक्यानजीक घडली. याबाबत ग्राम महसूल अधिकारी ( कुर्डुवाडी) प्रवीण किसन बोटे यांच्या फिर्यादीवरुन टेंभुर्णी पोलिसांत अण्णा पाटील शिराळ टें ता.माढा, अप्पा पराडे बाबुळगाव ता.माळशिरस, गणेश सोमनाथ काशीद परितेवाडी ता.माढा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबरोबरच प्रांताधिकारी यांच्या पथकाकडून वाळू वाहतूक करताना पकडलेला बिगर नंबरचा टिपर व ४ब्रास वाळू असा एकूण २ लाख २८ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर व त्यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, मंडल अधिकारी विशाल गायकवाड,सूर्यकांत डिकोळे फिर्यादी ग्राम महसूल अधिकारी प्रवीण बोटे, महसूल सेवक नवनाथ शिंदे, चालक अतुल दहिटणकर असे सर्व पथक अवैध वाळू वाहतूक व उत्खनन रोखण्याकरता जात होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दि.२३ रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी -भोसरे- घाटणे-लऊळ- उजनी मा- वरवडे – यामार्गे टेंभुर्णीकडे जात असताना पुणे – सोलापुर रस्त्याच्या लाईनवरून एक वाळूचा टिपर सोलापुरच्या दिशेने जात असताना दिसला. यावेळी प्रांताधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे यु टर्न घेऊन वाळूच्या टिपरचा पाठलाग करुन वरवडे टोल नाक्याजवळ टिपर थांबवण्यात आला. यावेळी टिपर चालक पळून जात असताना त्याला पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत पकडले असता त्याने त्याचे नाव गणेश सोमनाथ काशीद असे सांगितले. प्रांताच्या पथकाने टिपरची पाहणी केली असता एकूण ४ ब्रास वाळू आढळून आली. दरम्यान टिपर चालक कोणाला तरी फोन लावून आपला टिपर पकडला आहे असे सांगत होता.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सदर टिपरबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने अप्पा पराडे यांचा टिपर असून टिपरमधील वाळू अण्णा पाटील यांच्या शिराळा टेंभुर्णी येथील खड्ड्यावरुन आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाकडून सदर चालकासह वाळूने भरलेला टिपर टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडे आणत असताना वरवडे टोल नाक्याच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर पांढऱ्या रंगाची अल्कायझर गाडी क्रमांक ७ मधून कोणीतरी वारंवार हातवारे करत प्रांतांची शासकीय गाडी थांबविण्याचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत पांढऱ्या रंगाची फाॅर्च्यनर गाडी क्रमांक एम एच ४२ बी ३३९६ या गाडीतूनही कोणीतरी शासकीय गाडीला हात करुन थांबविण्याचा प्रयत्न करत होते.  प्रांतांची गाडी थांबत नसल्याचे दिसताच संबंधित फार्च्यूनर गाडीतील इसमाने रोडवर गाडी आडवी लावून रस्ता बंद करुन टाकला. त्यावेळी प्रांताधिकारी यांच्यासह पथकातील सर्व कर्मचारी खाली उतरले व प्रांताधिकारी यांनी वाहने का अडवली आणि तू कोण आहे असे विचारले असता समोरील व्यक्तीने अण्णा पाटील आहे असे म्हणत प्रांताधिकारी यांना उद्देशून तुझी दहशत लै झाली आहे. तू माझ्याच खड्ड्यावरील वाळूच्या गाड्या सारख्या अडवितेस म्हणून शिवीगाळ करुन महिला प्रांताधिकारी यांना धक्काबुक्की करत पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत अप्पा पराडे व टिपर चालक देखील होते. टिपर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यानंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यास फोन केला व पोलिस आल्याचे पाहून ते वाहनासह पळून गेले. सदर पथकाने पोलिस बंदोबस्तात टिपर व टिपरवरील चालकास टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आणले.

Web Title: Illegal sand smuggling truck on solapur pune highway caught by female provincial officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
1

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक
2

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
3

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश
4

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.