देशभरात गुन्हेगारीत (Crime)वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shradhha Walkar Case) हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. त्यांनतर प्रेम प्रकरणातून हत्या होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. नात्यात आलेल्या तणावातून गुन्हे घडण्याचं प्रमाणा फक्त भारतात नाही तर अशा घटना जगभरात घडत असतात. ऑस्ट्रेलियातही (Australia)अशीच एक घटना उघडकीस आली आहे. नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थिनी तिच्या माजी प्रियकरानेै जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. जस्मिन कौरला (वय,) असं मृत तरुणीचं नाव असून तिचा तारिकजोत अस तिच्या सनकी एक्स बॅायफ्रेंडचं नाव आहे. जास्मिनने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने त्याने सूड उगवण्यासाठी हे टोकाचे कृत्य केलं.
[read_also content=”उपचारासाठी आलेल्या रुग्णाची 31 लाखाची हिऱ्याची अंगठी कर्मचाऱ्यांने चोरली, कारवाईच्या भीतीने फेकली कमोडमध्ये! https://www.navarashtra.com/crime/employees-stole-a-diamond-ring-worth-31-lakhs-of-a-patient-in-hospital-threw-it-in-the-commode-nrps-427167.html”]
ही घटना 2021 मध्ये घडली असून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या वर्षी मार्चमध्ये तारिकजोत सिंगला दोषी ठरवण्यात आलं. 21 वर्षीय जस्मिन कौरचे 5 मार्च 2021 रोजी तारिकजोत सिंगने तिच्या अॅडलेड कामाच्या ठिकाणाहून अपहरण केले आणि चार तास कारच्या ट्रंकमध्ये टाकून दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातील एका दुर्गम गावात नेले. त्यानंतर 644 किमी नेत फ्लिंडर्स रेंजमध्ये तिला जिवंत पुरलं.
या प्रकरणी सुनवावणी सुरु असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तारिकजोतने जास्मिनच्या हत्येची योजना आखली होती, ज्यासाठी त्याने त्याच्या फ्लॅटमेटकडून पैसे घेतले होते. ज्या पद्धतीने कौर यांची हत्या करण्यात आली ती खरोखरच क्रूर होती, असं फिर्यादीच्या वकीलांनी म्हण्टलं.
फिर्यादी कारमेन माटेओ यांनी सांगितले की, ही हत्या सामान्य नव्हती आणि जस्मिनला खूप त्रास झाला असेल. तिला मातीत गाडताना माती त्याच्या घशात जात असेल आणि त्या वेळी त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल यावरून त्यांची वेदना समजू शकते, असे माटेओ म्हणाले. शिक्षेचा युक्तिवाद ऐकण्यासाठी कौरचे पालकही न्यायालयात उपस्थित होते.
तारिकजोतने यापूर्वीही जास्मिनला अनेक धमकीचे संदेश पाठवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तारिकजोतने आधी हत्येच्या केल्याचं फेटाळलं होतं. तसेच कौरने आत्महत्या केली असून मृतदेह पुरला होता, अशी कबुली दिली होती. तो अधिकार्यांना दफन स्थळी घेऊन गेला तेव्हा तिथे त्यांना कौरचे बूट, चष्मा आणि ओळखपत्र आणि डस्टबिनमध्ये टाय सापडला होता. तसेच तो हत्येच्या काही तास आधी, तो सीसीटीव्हीमध्ये हातमोजे, केबल्स आणि फावडे खरेदी करताना दिसला. या सगळ्या पुराव्यांवरुन त्याने तिची हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली.