औरंगाबाद : आजपासून राज्यात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला (SSC exams 2022) सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. एस पी जवळकर असं लाच स्वीकारणाऱ्या आरोपी संस्थाचालकाचं नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना संस्थाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या.
एस. पी. जवळकर यांच्या औरंगाबाद शहरात शिक्षण संस्था आहेत. 24 वर्षीय तरुणाने दहावीच्या परीक्षेसाठी पी. डी. जवळकर शाळेतून 16 नंबर फॉर्म भरला हॉता. या परीक्षेचे हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी या शाळेतील क्लार्क सविता खामगावकर यांनी त्याच्याकडे तीस हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”आयपीएलच्या नियमात बदल, आता प्रत्येक टीमला मिळणार चार डीआरएस, कोरोना हल्ला झाल्यास मॅच रिशेड्यूल होणार https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/changes-in-ipl-rules-now-each-team-will-get-four-drs-match-rescheduled-in-case-of-corona-attack-255104.html”]
तडजोडीनंतर 15 हजार रुपये देण्याचे ठरले, मात्र विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. जवळकरच्याच ज्ञानप्रकाश विद्या मंदिर या गारखेडा परिसरातील शाळेत एसीबीने ट्रॅप लावला. यापैकी दहा हजारांचा पहिला हप्ता एस. पी. जवळकरांनी शाळेत घेतला. नंतर ते उल्का नगरीतील घरी गेले. मात्र एसीबीचे पथक त्यांच्या मागोमाग घरी गेले आणि जवळकर यांना ताब्यात घेण्यात आले.
[read_also content=”मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! १५ टक्के पाणीकपात काही दिवस राहणार, भातसा धरणातील दुरुस्ती लांबली https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mumbaikars-use-water-sparingly-15-water-cut-will-last-for-a-few-days-repair-of-bhatsa-dam-is-delayed-255092.html”]