Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैजापूरमध्ये पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक

वैजापूर शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात गवळीबाबा मंदिर आहे. या मंदिराजवळ असलेल्या एका झोपडीत पुरोहित कैलास चव्हाण राहात होते. गेल्या दीड वर्षांपासून या मंदिरात पौरोहित्य करून ते तेथेच राहत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 10, 2022 | 11:26 AM
वैजापूरमध्ये पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद – वैजापूरमध्ये (Vaijapur) पुरोहिताची हत्या (Purohit Murder) करण्यात आली आहे. वैजापूर हरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प (Narangi Central Project) परिसरात मंदिरात (Tempel) पौरोहित्य करणाऱ्या ५५ वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. हत्येचा उलगडा अद्याप झाला नसला तरी, पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीच्या खूणा दिसून आल्या. कैलाश गणपत चव्हाण (रा. बुरुडगाव रोड-अहमदनगर) असे मृत पुरोहिताचे नाव आहे.

वैजापूर शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात गवळीबाबा मंदिर आहे. या मंदिराजवळ असलेल्या एका झोपडीत पुरोहित कैलास चव्हाण राहात होते. गेल्या दीड वर्षांपासून या मंदिरात पौरोहित्य (Priesthood) करून ते तेथेच राहत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील एका शेतकऱ्यास मंदिराच्या पाठिमागील बाजूस पुरोहिताचा मृतदेह दिसला. त्याने घटनेची माहिती तात्काळ वैजापूर पोलिसांना दिली.

वैजापूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चव्हाण यांचा मृतदेह गवळीबाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या झाडाझुडुपात आढळून आला. पाहणीदरम्यान घटनास्थळी पोलिसांना सायकल आणि थोड्याच अंतरावर काठीही आढळून आली. याशिवाय याच ठिकाणी असलेल्या एका पिशवीत ‘वशीकरण’ शीर्षक असलेले पुस्तकही पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करत, पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title: Killing of a priest in vaijapur vashikaran book found near the dead body nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 11:26 AM

Topics:  

  • Vaijapur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.