Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेकअपने केला घात, तिच्या रुपाला भुलला, प्रेमात पडला, शेवटी तिनेच त्याला गंडवलं; ती निघाली ४४ ची, आता होणार आहे आजी

प्रेमात फसवणूक झालेल्या या व्यक्तीचे म्हणणे आहे की, महिलेने त्याच्याकडून पैसेही लुटले आहेत. तो म्हणाला की त्याच्या मैत्रिणीने तिचे वय ३० वर्षे सांगितले होते पण ती ४४ वर्षांची आहे. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती लवकरच आजी होणार आहे. हे प्रकरण चीनच्या हेनान प्रांतातील आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 16, 2023 | 06:07 PM
love-fraud-crime-with-man-after-discovering-young-girlfriend-make-up-soon-to-become-grandma

love-fraud-crime-with-man-after-discovering-young-girlfriend-make-up-soon-to-become-grandma

Follow Us
Close
Follow Us:

मेकअप (Make Up) काय करू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण चीनमधून (China) समोर आले आहे. येथे एका व्यक्तीची प्रेमात फसवणूक (Cheating In Love) झाली आहे. गुओ (Guo) असे या ३१ वर्षीय व्यक्तीचे नाव असून तो चीनच्या सेंट्रल हेनान (Central Henan of China) प्रांताचा रहिवासी आहे. गुओचा दावा आहे की, एका महिलेने त्याची फसवणूक (Love Fraud) केली. महिलेने तिचे वय ३० वर्षे सांगितले होते मात्र तिचे वय ४४ वर्षे आहे. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महिला लवकरच आजी होणार आहे. हे प्रकरण सध्या चीनच्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दोघेही गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भेटले होते. त्यानंतर महिलेने तिची जन्मतारीख १९९२ सांगितली. बराच वेळ एकत्र घालवल्यानंतर तो त्या महिलेच्या प्रेमात पडल्याचे गुओने सांगितले. त्याने तिला त्याच्या कुटुंबाला भेटायला आणले, जिथे ती दोन आठवडे राहिली. गुओ म्हणाले, ‘मला वाटले माझे लग्न निश्चित झाले आहे. मला विश्वास होता की मला माझा जीवनसाथी सापडला आहे आणि मला माझे उर्वरित आयुष्य तिच्यासोबत घालवायचे आहे. मात्र, एक फोन आल्याने गुओच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

[read_also content=”कर्जाचा सापळा, तीन नराधम आणि कब्रस्तानात पुरलेला मृतदेह… हे रहस्य झालं उघड अन् पोलीसही चक्रावून गेले https://www.navarashtra.com/crime/delhi-crime-mangolpuri-woman-murder-funeral-graveyard-burial-disclosure-accused-police-arrested-nrvb-362130.html”]

गुओला त्याच्या आईने गेल्या वर्षी ९ डिसेंबरला फोन करून आपल्या मैत्रिणीची हकीकत सांगितली, जी ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्याने लगेचच नाते संपवले. गुओ म्हणाले, ‘माझ्या आईने तिचे खरे वय सांगितले आणि महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे सांगितले. तिच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्याची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. तुम्ही बघू शकता, जी बाई आजी बनणार आहे ती माझ्याशी रिलेशनशिपमध्ये आहे.

गुओ म्हणाले- याचा अर्थ माझ्या वयात मला आजोबा होण्यास भाग पाडले जात होते. हे किती लज्जास्पद आहे. मला असे वाटते की मी माझ्या गावकऱ्यांना तोंड दाखवू शकलो नाही कारण त्यांना ही फसवणूक माहित आहे.

गुओने सांगितले की त्याची मैत्रीण तरुण दिसते आणि तसेच कपडेही घालते. जेव्हा ती मेकअप करते तेव्हा तिचे खरे वय कोणीही सांगू शकत नाही. त्याने सांगितले की त्याच्या आईने महिलेशी बोलून तिच्या घराबद्दल विचारले होते. आईचे नातेवाईकही ती राहत असलेल्या समाजात राहतात, त्यांनी मैत्रिणीबद्दल माहिती गोळा केली.

[read_also content=”घराचा होणार होता लिलाव, आता या पठ्ठ्यानं घेतली 50 लाखांची ऑडी, 10 मिनिटांचा व्हिडिओ 2 कोटी वेळा पाहिला https://www.navarashtra.com/viral/bihari-viral-boy-house-was-going-to-be-auctioned-now-this-letter-has-bought-an-audi-worth-50-lakhs-10-minute-video-has-been-viewed-2-crore-times-nrvb-362145.html”]

गुओने सांगितले की, आपली केवळ प्रेमात फसवणूक झाली नाही तर १.२१ लाख रुपये लुटले गेले. ती वेगवेगळ्या बहाण्याने पैसे मागायची. त्याने पोलिसांना विचारणा केली असता महिलेची जन्मतारीख १९७८ असल्याचे कळले. मात्र, पोलिसांनी आरोपी महिलेवर काही कारवाई केली की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Love fraud crime with man after discovering young girlfriend make up soon to become grandma nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2023 | 06:07 PM

Topics:  

  • grandma
  • make up

संबंधित बातम्या

पांचट Jokes: नातू – तुम्ही वयाच्या 80 वर्षातही आजीला डार्लिंग, स्वीटी का बोलता? आजोबांचे मिश्किल उत्तर वाचून हसून हसून वेडे व्हाल
1

पांचट Jokes: नातू – तुम्ही वयाच्या 80 वर्षातही आजीला डार्लिंग, स्वीटी का बोलता? आजोबांचे मिश्किल उत्तर वाचून हसून हसून वेडे व्हाल

नोकरी करणाऱ्या महिलांच्या मेकअप पाऊचमध्ये कायम असायला हव्यात ‘या’ गोष्टी, मिनिटांमध्ये पडेल सौंदर्यात भर
2

नोकरी करणाऱ्या महिलांच्या मेकअप पाऊचमध्ये कायम असायला हव्यात ‘या’ गोष्टी, मिनिटांमध्ये पडेल सौंदर्यात भर

चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले ‘हे’ घरगुती पदार्थ, त्वचेचे होणार नाही कोणतेच नुकसान
3

चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले ‘हे’ घरगुती पदार्थ, त्वचेचे होणार नाही कोणतेच नुकसान

यमराजाला इम्प्रेस करायचं आहे का? रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत आजी करू लागली मेकअप; हास्यास्पद Video Viral
4

यमराजाला इम्प्रेस करायचं आहे का? रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत आजी करू लागली मेकअप; हास्यास्पद Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.