धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर... (संग्रहित फोेटो)
मातोश्रीनगर येथील रहिवासी कविता गणेश पिंपळशेंडे (वय ३८) या सोमवारी सकाळी ८ वाजता घरात मृतावस्थेत आढळल्या. स्वयंपाकघरात हीटरवर पाणी गरम केले जात होते. कविता यांच्या शरीरावर विजेचा धक्का लागल्याच्या आणि भाजल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. परंतु, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी कविताचा मृत्यू डोक्यावर झालेल्या जोरदार आघातामुळे झाल्याचे निश्चित केल्यानंतर प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. मृताच्या अंगावर विजेचा शॉक लागल्याचे भासवण्यासाठी आरोपीने हीटरचा वापर करून बनाव रचला होता.
इलेक्ट्रिशियन असल्याचा घेतला फायदा
आरोपी जावेद व्यवसायाने इलेक्ट्रशियन आहे. कविताचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे भासवण्यासाठी त्याने हीटरने शरीराला विजेचे झटके दिले आणि नंतर हीटरवर पाणी गरम ठेवल्याचे नाटक केले. सोमवारी सकाळी पती गणेशने फोन न उचलल्यामुळे नातेवाईकांना मुलांना घरी पाठवण्यास सांगितले, तेव्हा हा प्रकार उजेडात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कोठेवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कॉल जावेदला केल्याचे निष्पन्न
पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. घटनेच्या वेळी कविताचा पती गणेश हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने भंडारा येथील मूळ गावी होता. त्याच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी कविताच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता बहुतेक कॉल जावेदला केल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या वेळी त्याचे मोबाईल लोकेशन वानाडोंगरी येथेच होते तर सोमवारी सायंकाळी त्याचे लोकेशन जळगाव येथे आढळले. पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या पथकाने जळगावला पोहोचून जावेदला घरातून जेरबंद केले.
💡 Frequently Asked Questions
अनैतिक संबंधातून महिलेची हत्या कुठे झाली?
– ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हत्या का केली? कारण काय?
– प्राथमिक तपासानुसार अनैतिक संबंधातून वाद झाला. संबंध उघडकीस येण्याच्या भीतीने हत्या केल्याचा संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपी कोण आहे?
– मृत महिलेचा प्रियकर असलेल्या जावेद शेख शाहिद मन्यार याने ही हत्या केल्याचा आरोप आहे. तो शिव कॉलनी, जळगाव येथील रहिवासी आहे.
वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश






