Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटात एनआयएला मोठं यश, मुख्य सूत्रधाराला अटक, तीन राज्यात छापेमारी!

बॉम्बस्फोटाच्या तपासात एनआयएला मोठे यश मिळाले आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 29, 2024 | 09:03 AM
बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटात एनआयएला मोठं यश, मुख्य सूत्रधाराला अटक, तीन राज्यात छापेमारी!
Follow Us
Close
Follow Us:

या महिण्याच्या सुरुवातीला बेंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वर रामेश्वर कॅफेमध्ये स्फोट(Rameshwaram cafe Blast)  झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या स्फोटामध्ये पाच लोक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी सुरु असताना आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या स्फोटानंतर एनआयएने गुरुवारी तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. या दरम्यान या स्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांची जहरी टीका https://www.navarashtra.com/maharashtra/jayant-patil-says-shivsena-should-hire-hit-actor-over-govinda-joining-eknath-shinde-political-news-nrpm-518571.html”]

18 ठिकाणी छापे टाकण्यात आले

एनआयएकडून स्फोट संबधित तपास सुरू आहे. या तपासदरम्यान एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि यूपीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाई दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये  मुख्य सूत्रधार मुझम्मील शरीफ याला अटक करण्यात आली आहे. एनआयएने तीन राज्यात 18 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये कर्नाटकात 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. तामिळनाडूमध्ये 5 आणि उत्तर प्रदेशात एका ठिकाणी छापे टाकण्यात आले.

गजबजलेल्या भागात झाला स्फोट

बंगळुरू मधील सर्वात वर्दळीच्या ब्रुकफील्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या फुटेजमध्ये तो हॉटेलमध्ये घुसल्याचेही फुटेज आहे. आरोपीने मास्क, टोपी आणि चष्मा घातलेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या हातात बॅगही आहे. फुटेजमध्ये आरोपी सकाळी 11:34 वाजता रामेश्वर कॅफेमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. कॅफेमध्ये प्रवेश करताना तो फोनवर बोलताना दिसतो. कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर आरोपी रवा इडलीची ऑर्डर देतो. ऑर्डर घेतल्यानंतर तो पूर्ण करतो. यानंतर तो किचनच्या सिंकमध्ये जातो. हात धुण्याच्या बहाण्याने, तो किचन सिंकजवळ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) असलेली बॅग ठेवतो. यानंतर तो कॅफेच्या बाहेर येतो.

Web Title: Main accused of arrested rameshwaram cafe blast nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 09:03 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.