Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

kolhapur Crime News: मटका अड्ड्यासाठी पंटर अन् एजंटचं जाळं..;तरूण-तरूणी कामाला लावले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले

पोलिस तपासात काही महत्त्वाचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागले आहेत.  शंकर माळी याने गडहिंग्लजसह परिसरातील ग्रामीण भागात पंटर व एजंटांचं मोठं जाळं उभं केलं होतं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 14, 2025 | 06:15 PM
kolhapur Crime News: मटका अड्ड्यासाठी पंटर अन् एजंटचं जाळं..;तरूण-तरूणी कामाला लावले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले
Follow Us
Close
Follow Us:

Kolhapur Crime News:  शहरातील भडगाव रोडवरील साई उद्यानाजवळील एका घरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गडहिंग्लज पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ जणांना अटक केली आहे. यामध्ये अड्डा चालवणारा मटका बुकी शंकर माळी याच्यासह चार महिला कामगारांचाही समावेश आहे. पोलिसांनी या छाप्यात सुमारे चार लाख चार हजार ११३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आली. बेळगुद्री याच्या जुन्या घरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रमेश मोरे, उपनिरीक्षक हणमंत नाईक आणि पल्लवी पवार यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुरुवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास पथकाने सुरुवातीला परिसराची पाहणी करून मटक्याची खात्री केली. त्यानंतर अचूक माहितीच्या आधारे शंकर माळीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तीन प्रिंटर, लॅपटॉप, मोबाईल फोन, की-बोर्ड, कॅल्क्युलेटर, मोटारसायकल, रोकड व अन्य साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.

Pravin Gaikwad Attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण पोहोचले विधानसभेत; CM फडणवीस म्हणाले, “ते फिर्याद देण्यास…

पोलिस तपासात काही महत्त्वाचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागले आहेत.  शंकर माळी याने गडहिंग्लजसह परिसरातील ग्रामीण भागात पंटर व एजंटांचं मोठं जाळं उभं केलं होतं. हे एजंट ग्राहकांकडून ऑनलाइन मटका खेळवून संबंधित रक्कमेचा हिशोब मोबाईलवरून देत असत. या साठी अनेक तरुण व तरुणी काम करत होते. विशेष म्हणजे यामध्ये चार महिला कामगारांचाही समावेश असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या महिलांमध्ये दोन सख्ख्या बहिणी असून त्या मूळच्या कर्नाटकातील नांगनूर (ता. हुक्केरी) येथील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणींना लॅपटॉपवर काम करण्यासाठी रोजगार देण्यात आला होता. अड्ड्यावरून महिलांच्या सहभागामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या कारवाईमध्ये प्रियंका इंगवले, धनश्री सावंत, दादू खोत, रामदास किल्लेदार आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Maharashtra Rain: कोसळधार थांबणार! राज्यात पाऊस ‘इतके’ दिवस ब्रेक घेणार; कसे असणार वातावरण?

या प्रकरणी, शंकर माळी (मुख्य मटका बुकी), प्रभू रामचंद्र नाईक (२४), विनायक विलास नाईक (२५), अनुराग अनिल कांबळे (२३, सर्व रा. दुंडगे), समीर गुलाब मुल्ला (४४, रा. इंचनाळ), प्रमोद बाळाप्पा देवत्रावर (३५, रा. निलजी), परशराम शंकर नाईक (३४), माधव मोकाशी (२५), मयूरी माधव मोकाशी (२०), स्वप्नाली राजू सुतार (२२, रा. गडहिंग्लज), अश्विनी रूपेश सुतार (३२), दयानंद साताप्पा बेळगुद्री (रा. साई गार्डन शेजारी, गडहिंग्लज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलीस प्रशासनाची ही कारवाई ही चक्रवाढ स्वरूपात सुरू राहील, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Web Title: Major operation at matka adda in gadhinglaj 12 people arrested valuables worth four lakhs seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 06:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.