मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon bomb Blast Case) सुरू असलेल्या खटल्यादरम्यान आणखी एक साक्षीदार फितूर झाल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने (State government) मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay high court) विशेष एनआयए न्यायालयाला (Special NIA court) देण्यात आली. यासोबतच खटल्यातील फितूर झालेल्यांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. २९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट (Masjid boom blast) झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. (Lt Col Prasad Purohit, Sadhvi Pragya Singh Thakur along with Ramesh Upadhyay, Sameer Kulkarni, Sudhakar Chaturvedi, Sudhakar Dwivedi, Ajay Rahirkar were arrested)
[read_also content=” Maharashtra Navnirman Sena https://www.navarashtra.com/maharashtra/commentary-on-kho-kho-matches-in-marathi-language-mns-visit-to-sony-ten-office-308479.html”]
दरम्यान, त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत. खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितच्या ओळखीच्या व्यक्तीने मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयासमोर दावा केला की, त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएसने ३० ऑक्टोबर २००८ रोजी त्याच्या घरातून नेले आणि २८ नोव्हेंबर २००८ पर्यंत बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. तपास यंत्रणेकडून आपल्या कुटुंबियांचा छळ केल्याचा आरोप त्याने केला.
तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत का? अशी विचारणा साक्षीदाराला आली तेव्हा, त्याने नकारार्थी उत्तर दिले. त्यावर विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी आक्षेप घेतला. दाखल केलेल्या आरोपपत्रात साक्षीदार अभिनव भारत ट्रस्टबद्दल बोलला होता ज्याचा कथितपणे पुरोहितशी संबंध होता. साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, ट्रस्टशी संबंधित सर्व लोक ज्या ध्येयासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती त्या दिशेने काम करत होते. असा दावा करत साक्षीदार फितूर झाला असल्याचे राज्य सरकारकडून घोषित करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील फितूर साक्षीदारांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.