बकरीचा डोळ्यामुळे (Goat Eyes) माणसाला जीव कसा काय जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच पण हे खरं आहे. छत्तीसगडमधल्या सूरजपूर जिल्ह्यातील एका गावकऱ्यासोबत अशीच एक घटना घडली. बकरीच्या डोळ्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. आधी बकऱ्याचा बळी दिला त्यांनतर त्याच मटण बनून खाल्लं मात्र, जेवण केल्यानंतर लगेच त्याला अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यांचा मृत्यू झाला. (Goat Eye Stuck In Man’s Throat) नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या.
[read_also content=”नववधूच्या आईचा ढासू डान्स, डीजेवर उडवला सिगारेटचा धुवा, तर नववधूने दिलं फ्लाइंग किस, लग्न न करताच वराने ठोकली धूम! https://www.navarashtra.com/crime/groom-refuse-to-marry-to-bride-after-seeing-his-mother-in-law-dance-in-wedding-ceremony-nrps-426673.html”]
हे प्रकरण सुरजपूरला लागून असलेल्या पररी गावाशी संबंधित आहे. रामानुजनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मदनपूर गावात राहणारा ५० वर्षीय बगर साई रविवारी गावातील काही मित्रांसह प्रसिद्ध खोपा धाम येथे गेला होता. त्याने नवस मागितला होता. नवस पूर्ण झाल्यावर बोकडाचा बळी देण्यासाठी तो खोपा धामला गेला.
बगर साई येथे पूजा केल्यानंतर त्यांनी बोकडाचा बळी दिला. यानंतर सर्वांनी मिळून बकऱ्याच्या मटण बनवलं. आणि सगळ्यांनी मटणावर यथेच्छ ताव मारला, यावेळी बगरने मटण खाताता भाजीतील बकऱ्याचा डोळा काढला आणि खाल्ला. पण दुर्देवाने तो डोळा त्याच्या त्याच्या घशात अडकला. त्यामुळे बागर याला अस्वस्थ वाटायला लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.
गावकऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बागर यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. बागर यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अशाप्रकारे नवस फेडण्यासाठी गेला आणि त्याच्याच मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.