अलीगढ : देशात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीसह, हैदराबादमध्येही गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमध्ये (Man Killed In Dog Attack) अनेकांना आपला जीव गमवाावा लागला आहे. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधून समोर आली आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (Morning Walk) ला गेलेल्या एका व्यक्तीला कॅम्पसमध्ये 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी चावा घेत जखमी केले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सफदर अली (वय,65) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर, परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. ही सगळी घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
[read_also content=”सणकी मुलानं संपवल अख्ख कुटुंब! आझमगडमध्ये आई-वडील आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या https://www.navarashtra.com/crime/a-man-killed-his-mother-father-and-sister-over-family-disputes-in-azamagarh-nrps-385755.html”]
मिळालेल्या माहिती नुसार, AMU कॅम्पस मधील सिव्हिल लाइन्समध्ये राहणारे सफदर अली रविवारी सकाळी 7.30 वाजता एएमयू कॅम्पसमध्ये फिरत असे. त्यावेळी अचानक 10 ते 12 कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी परिसरात कुणीही नसल्याने त्यांच्या मदतीसाठी कुणीही आलं नाही. दुर्देवाने थो़ड्या वेळाने त्यांचा मृत्यू झाला. काही लोकांना त्यांचा मृतदेह आढल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. AMU कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुत्रा चावलाची संपूर्ण घटना कैद झाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सफदरचा मृत्यू कुत्रा चावल्याने झाल्याची बाब समोर आली. एसपी कुलदीप गुणवत यांनी सांगितले की, सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदन पाठवण्यात आला असुन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल.
CCTV footage of the painful death of a person due to dog attack emerged.
More than half a dozen #dogs attacked a person in the Aligarh Muslim University campus of Thana Civil Line area of Aligarh, which killed the person on the spot. pic.twitter.com/5XedupSu90
— Dr. Sandeep Seth (@sandipseth) April 16, 2023