मंचर : मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेच्या प्रांगणातून १५ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून मुलींच्या आईने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मंचर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १२ तासांच्या आत मुलींचा शोध घेऊन त्यांना आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक ४ जानेवारी रोजी मंचर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलींच्या आईने त्यांच्या शाळेच्या प्रांगणातून अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला.
Todays Gold Price: सोन्याच्या किंमती अचानक घसरल्या, चांदीही झाली स्वस्त! खरेदीपूर्वी वाचा आजचा भाव
मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत कंकाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपासासाठी पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक पडताळणीच्या आधारे रविवारी, दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी मंचर येथील पिंपळगाव रस्त्यावरील एस कॉर्नर परिसरात दोन्ही मुली सापडल्या.
मुलींच्या अपहरणाचा संशय, त्यांचे शाळेतून बेपत्ता होणे, आणि त्या स्वतःहून गेलेल्या होण्याची शक्यता या सर्व बाबींची चौकशी मंचर पोलीस करत आहेत. जलद आणि प्रभावी कारवाईसाठी मंचर पोलीस दलाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
Bigg Boss 18 : टाईमच्या खेळामध्ये बिग बॉसचा नवा ट्विस्ट! हे सदस्य अडकणार नॉमिनेशनच्या
नाशिक शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रविवारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल बाळाच्या आईशी मैत्री करून संबंधित महिलेने हा गुन्हा केला. शनिवारी महिलेने बाळाला आईकडून घेतले आणि सांगितले की, ती बाळाला त्याच्या वडिलांकडे देईल. त्या वेळी बाळाचे वडील रक्त अहवाल आणण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, त्यानंतर महिला बाळासह फरार झाली.
कुटुंबीयांनी ही बाब लक्षात येताच तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास हाती घेतला आणि संबंधित महिलेचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले. या फुटेजच्या आधारे महिलेचा माग काढला गेला आणि ती नाशिकपासून २५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी येथे असल्याचे उघड झाले.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला दिंडोरी येथून ताब्यात घेतले आणि अपहरण केलेल्या बाळाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत महिलेने सांगितले की, तिला मूल नव्हते आणि मूल हवे असल्यानेच तिने हा प्रकार केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शरीरात विटामिन बी 12 ची निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा