विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे
निरोगी आरोग्य जगण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता जाणवू लागल्यास संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला जीवनसत्वे मिळतील अशा पदार्थांचे सेवन करावे. शरीरासाठी सगळ्यात महत्वाचे असणारे विटामिन म्हणजे विटामिन बी 12 . शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देऊन आहारात विटामिन बी 12 युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया बिघडणे, दृष्टी अंधुक होणे, हातापायांमध्ये सतत मुंग्या येणे, जीभ अडखळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात विटामिन बी 12 युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच हे विटामिन शरीर स्वता तयार करत नाही. त्यामुळे इतर गोष्टींची मदत घेऊन या विटामिनची पातळी भरून काढावी लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील कमी झालेली विटामिनची पातळी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बीटचे सेवन केल्यास शरीरातील विटामिन बी 12 ची कमतरता भरून निघेल. दैनंदिन आहारात नियमित बीटचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बीटमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. शिवाय सूर्यफुलाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन बी 12 आढळून येते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन बी 12 ची पातळी भरून काढण्यासाठी आहारात बीटच्या रसाचे सेवन करावे.
शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यास राजमा खावा. यामुळे शरीरातील विटामिन बी 12 वाढते. शिवाय तुम्ही दैनंदिन आहारात कल्याण बियांचे सेवन करू शकता. शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दैनंदिन आहारात खावे. यामुळे शरीरात कॅल्शियमसह विटामिन बी 12 ची पातळी सुद्धा वाढते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पालक, मेथी, मोहरी पाने, मुळा, चवळी इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. विटामिन बी 12 शरीराला मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आहारात नेहमी विटामिन बी 12 युक्त पदार्थांचे सेवन करावे.