Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात तीन महिन्यात चारशेवेळा वाहतूक कोंडी; ‘टॉम टॉम’च्या अहवालानंतर उपाययोजना सुरु

टॉम-टॉम या जागतिक संस्थेने पुणे वाहतूक कोंडीत चौथा क्रमांकावर असल्याचे जाहिर केल्यानंतर पुणे पोलिसांनी विविध उपाययोजनांसोबतच कोंडीची कारणे देखील शोधत त्याचा अभ्यास केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 28, 2025 | 12:51 PM
पुण्यात तीन महिन्यात चारशेवेळा वाहतूक कोंडी; 'टॉम टॉम'च्या अहवालानंतर उपाययोजना सुरु

पुण्यात तीन महिन्यात चारशेवेळा वाहतूक कोंडी; 'टॉम टॉम'च्या अहवालानंतर उपाययोजना सुरु

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : टॉम-टॉम या जागतिक संस्थेने पुणे वाहतूक कोंडीत चौथा क्रमांकावर असल्याचे जाहिर केल्यानंतर पुणे पोलिसांनी विविध उपाययोजनांसोबतच कोंडीची कारणे देखील शोधत त्याचा अभ्यास केला आहे. जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांच्या या अभ्यासातून वेगवेगळ्या कारणास्तव सव्वा चारशेवेळा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पोलिसांनी यातूनही स्पष्टता आणत कोंडी टाळता येणारी कारणे व टाळता न येणारी कारणेही, शोधली आहेत. यानूसार आता कोंडी न होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची तीच परिस्थिती आहे. पण त्यावर वाहन संख्या मात्र, वर्षाला लाखाने वाढत आहे. त्यामुळे आपसूकच कोंडी वाढतच चालली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस व महापालिका एकत्रित काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी नव्याने प्रयोग सुरू करून ते यशस्वी करून दाखविले आहेत. शहरातील प्रचंड कोंडीचे चित्र हळू-हळू कमी होत असल्याचेही जानवत आहे.

काही वेळा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी होते. तर, काही वेळा नागरिकांच्या चुकीमुळे व याठिकाणी पोलीस उपस्थित नसल्याने कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी ३ महिन्यांचा शहाराचा आढावा घेतला आहे. त्यात सर्वाधिक कोंडी वाहने रस्त्यावर बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. ३ महिन्यात तब्बल ११४ वेळा वाहने बंद पडल्याने कोंडी निर्माण झाली. त्यात सर्वाधिक पीएमपी बसेसची संख्या आहे. त्यासोबतच अचानक आलेल्या वाहतूक फ्लोमुळे कोंडी निर्माण झाली. कार्यक्रम पार पडल्यानंतर तसेच सुरू होण्यापूर्वी एकाच भागात अचानक वाहन संख्या वाढते आणि त्या परिसरात कोंडी निर्माण होते. अशा पद्धतीने ३ महिन्यात १२८ वेळा कोंडी निर्माण झाली आहे. त्यासोबतच, बेशिस्त वाहन लावणे, चालविणे, खड्डे, अपघात, रस्त्यांची कामे, वेगवेगळे कार्यक्रम तसेच सिग्नल बंद पडण्याच्या घटनांमुळे देखील कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.

टाळता येणारी वाहतूक कोंडी

  • चारही बाजूंच्या रस्त्यावर झालेली कोंडी – २५
  • वाहतूक नियमभंग (उलटा प्रवास, मध्येच वाहन दामटणे)- ६
  • रस्त्यावर खड्डे- १३
  • रस्त्यांचे कामकाज सुरू असणे- ६१
  • अचानक रस्त्यावर वाहतूक फ्लो जास्त येणे- १२८
  • कार्यक्रम तसेच उत्सव- ४८
  • वाहन बंद पडणे- ११४

न टाळता येणारी वाहतूक कोंडी

  • अपघात – १६
  • व्हीआयपी दौरे – ६
  • सिग्नल बंद – ०९
  • इतर कारणे- ०२
  • एकूण तीन महिन्यात ४२८ वेळा अशा पद्धतीने वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Web Title: Measures have been initiated to solve traffic congestion in pune after tomtom report nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 12:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.