Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यातील ‘या’ भागातून दोन चिमुकल्यांचे अपहरण, एकाची हत्या तर दुसरा अजूनही बेपत्ता, नेमकं घडतंय काय?

गेल्या काही दिवसांपासून चिमुकल्यांचे अपहरण होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातून वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकाची हत्या करून त्याला उकीरड्यात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. तर दुसरा 14 वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 24, 2024 | 02:57 PM
बुलढाण्यातील 'या' भागातून दोन चिमुकल्यांचे अपहरण, एकाची हत्या तर दुसरा अजूनही बेपत्ता, नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य-ट्विटर)

बुलढाण्यातील 'या' भागातून दोन चिमुकल्यांचे अपहरण, एकाची हत्या तर दुसरा अजूनही बेपत्ता, नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाण्यातून चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकाची हत्या करून त्याला उकीरड्यात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. तर दुसरा 14 वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी १० वर्षीय शेख अरहान शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते. यामध्ये तपासाअंती त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेत असताना या चिमुकल्याचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलीसांना संशय आला. पोलिसांनी शेख अन्सार ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेहाला उकीरड्यात पुरले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकीरड्यातून बाहेर काढला.

आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र यामुळे आंबाशी गाव व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा मंगळवारपासून (23 जुलै) बेपत्ता झाला आहे. कृष्णा राजेश्वर कराळे असे या मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० वाजता तो शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतरही बराच काळ घरी परतला नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. गावात, शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा सापडला नाही.

आज २४ जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही. तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आपल्या मुलांवर देखरेख ठेवून, काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले. अजूनही बेपता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Minor childern went missing form ambashi village and shegaon areas of buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 02:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.