Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshman Hake News: बापाने ७० हजार कोटी पचवले, पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात..; लक्ष्मण हाकेंनी तोफ डागली

लक्ष्मण हाके यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये पार्थ पवारांचा फोटो शेअर करत अजित पवार आणि पार्थ पवारांवर टिका केली आहे. "पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा. असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं  आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 09, 2025 | 09:20 AM
Lakshman Hake News: बापाने ७० हजार कोटी पचवले, पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात..; लक्ष्मण हाकेंनी तोफ डागली
Follow Us
Close
Follow Us:
  • पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्ल एलएलपी कंपनीचा घोटाळा
  • १८०० कोटी बाजारभाव असलेली जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतली
  • पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा

 

Parth Pawar Land: पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्ल एलएलपी कंपनीने १८०० कोटी बाजारभाव असलेली जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्यवहारात मुद्रांक शुल्क ( Stamp Duty) माफ करण्यात आले. या जमीन व्यवहारात सर्व सरकारी नियम पायदळी तुडवत ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

विरोधकांकडून या प्रकरणावरून दबाव वाढू लागला, आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यानंतर अखेर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं. पार्थ पवार यांच्या जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रद्द करण्याबाबत अमेडिया कंपनीने अधिकृतपणे पत्र देऊन संबंधित विभागाला कळवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधला आहे. “पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपट तयार करावा,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

लक्ष्मण हाके यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये पार्थ पवारांचा फोटो शेअर करत अजित पवार आणि पार्थ पवारांवर टिका केली आहे. “पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा. असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं  आहे.

काय म्हटलं आहे लक्ष्मण हाकेंनी फेसबुक पोस्टमध्ये?

( पवार पॅटर्न बारामती )
१८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले अशी पत्रकार परिषद बहुजन नेते काळुराम चौधरी यांनी केली म्हणजे बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली.

बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत.

उदा.
-एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये.
-शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये.
-सरकारी खात्याची जमिन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी.
-भविष्य काळात मरिनड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या. जमिनींकडे दुर्क्ष करावे.

प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातता जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात १५, २० हजार कोटींच्या जमिन खरेदीचा घोटाळा करावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम,तओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारने महार वतनाची जमिन कंपनीच्या नावे केली तेव्हा जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या अनात माती कालवली नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल याचं सत्य महाराष्ट्रा पुढे येईल असे वाटत नाही.
– लक्ष्मण हाके

Web Title: Mulshi pattern 2 should be made into a film based on parth pawars scandal laxman hakes criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 09:20 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.