Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मुंबईत घातपाताचा कट! दिल्ली पोलिसांनी उधळला डाव, ISISचे दोन दहशतवादी अटकेत

आयसिसशी संबंधित मुंबईतील आफताब आणि सुफियान या दोघा दहशतवाद्यांच्या अटकेनंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर स्पेशल सेलने छापे टाकले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 12, 2025 | 10:44 AM
Mumbai attack plot: Delhi Police arrests two ISIS terrorists

Mumbai attack plot: Delhi Police arrests two ISIS terrorists

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
  • हरियाणातून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांची खरेदी
  • दहशतवादी सोशल मीडिया अकाउंटद्वारे पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात

 New Delhi : दिल्ली पोलिस दलातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींच्या पथकाने ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.  आयसिसशी संबंध असलेल्या आफताब आणि सूफियान या दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा कट होता. मात्र, त्यांच्या योजना उधळून लावत पोलिसांनी त्यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरूनच ताब्यात घेतलं.

आफताब आणि सूफियान हे दोघेही मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत दहशतावादी कारवाई कऱण्यासाठी त्यांनी हरियाणातील मेवात परिसरातून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांची खरेदी केली होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा आणि दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा डाव होता.  पोलिसांनी दोघांकडून ३ पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला टळल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी, पुढील चार दिवस…

 आयसिसशी संबंधित मुंबईतील आफताब आणि सुफियान या दोघा दहशतवाद्यांच्या अटकेनंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर स्पेशल सेलने छापे टाकले. या छाप्यात पोलिसांनी शस्त्रास्त्रांसोबत ID बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.   सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघेही पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात होते.या कारवाईनंतर पोलिसांना मुंबईत मोठ्या प्रमाणात घातपाताचा कट उधळण्यात यश मिळाले असून पुढील चौकशी सुरू आहे.

स्पेशल सेल व केंद्रीय एजन्सींची संयुक्त कारवाई; आयईडी साहित्य जप्त

दुसरीकडे या कारवाईशी संबंधित आणथी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही आयईडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन जण दिल्लीचे, तर प्रत्येकी एक मध्य प्रदेश, तेलंगणातील हैदराबाद आणि झारखंडमधील रांची येथील आहे. अटक केलेल्या पाच दहशतवाद्यांची नावे अशर दानिश, सुफियान अबुबकर खान, आफताब अन्सारी, हुजैफा यमन आणि कामरान कुरेशी अशी आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण भारतातील दहशतवादी नेटवर्क उघडकीस आल्याचे असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पाहावी लागणार अजूनही वाट; बिहार निवडणुकीपूर्वी नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता

खिलाफत स्थापन करण्यासाठी जिहादी लष्कर

भारतात खिलाफत स्थापन करण्यासाठी एक जिहादी लष्कर तयार केले जात होते. यासाठी इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि फेसबुकवर दहशतवादी मॉड्यूल सक्रिय होते. जिथून तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून देशात दहशत निर्माण करण्याचे कट रचले जात होते. स्पेशल सेलने ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. सूत्रधार अशर दानिशकडून शस्त्रे बनवण्याचे साहित्य, दारूगोळ्याचे भाग आणि ‘खिलाफत’ स्थापन करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

नवीन दहशतवादी मॉड्यूलची उकल

 दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका नव्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून त्याचे सदस्य दिल्ली, रांची, ठाणे, निजामाबाद आणि राजगड येथे ओळखले गेले आहेत, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (सीपी) पी. एस. कुशवाह यांनी सांगितले.  या संघटनेचे सदस्य स्फोटके तयार करण्याचे तसेच आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते. त्याचबरोबर ते दिल्ली/एनसीआरमार्गे शस्त्रे खरेदी करण्याचे प्रयत्न करत होते आणि विविध दुकानांमधून तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आयईडीसाठी लागणारी रसायने विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे,

स्पेशल सेल आणि केंद्रिय एजन्सी संयुक्तपणे या मॉड्यूलशी संबंधित चौकशी करत आहेत. तपासादरम्यान ज्या ठिकाणी छापे टाकले गेले तिथून शस्त्रसाहित्य, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक साधने तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मॉड्यूलचा उद्देश मोठ्या प्रमाणात हल्ले घडवणे हा असल्याचे संशय आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai attack plot delhi police arrests two isis terrorists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • ISI
  • Mumbai Terrorist Attack

संबंधित बातम्या

‘Project Pelican’मुळे खळबळ; भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थक, ISI आणि ड्रग्ज नेटवर्कचा भयंकर कट उघड
1

‘Project Pelican’मुळे खळबळ; भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थक, ISI आणि ड्रग्ज नेटवर्कचा भयंकर कट उघड

ISI चा ‘हनी ट्रॅप’ कट महाराष्ट्रात उघड; ठाण्याच्या रवी वर्माला कसं अडकवलं?
2

ISI चा ‘हनी ट्रॅप’ कट महाराष्ट्रात उघड; ठाण्याच्या रवी वर्माला कसं अडकवलं?

Top 5 Intelligence agencies in World: रहस्यांच्या दुनियेतील बादशाह आहेत या पाच गुप्तचर यंत्रणा
3

Top 5 Intelligence agencies in World: रहस्यांच्या दुनियेतील बादशाह आहेत या पाच गुप्तचर यंत्रणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.