दोन तासांत 17 मुलींचा विनयभंग; नागपुरात घडला खळबळजनक प्रकार
मृत्यूनंतर कुणी पुन्हा जिवंत झालं किंवा अगदी त्या मृत व्यक्तीसारखीच दुसरी जिवंत व्यक्ती दिसली, असं दृश्य तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल. खऱ्या आयुष्यात हे शक्य नाही हे आपल्याला माहिती आहे. पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील मोतिहारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना चर्चेत होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृत मानून मुलीचे पिंडदान ही केले. आता महिनाभरानंतर मुलगी जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. या घटनेनंतर आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे. ज्या मुलीचा मृतदेह पीडितेच्या कुटुंबीयांनी ओळखला तो मृतदेह कोणाचा होता? तसेच, मुलीची हत्याच झाली नसताना आरोपींनी हत्येची कबुली पोलिसांसमोर का दिली?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 जुलै) रात्री तुर्कौलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या अल्पवयीन मुलीला जप्त करण्यात आली. भीतीपोटी ती तिथे लपून बसल्याचे मुलीने सांगितले. बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाणे गाठले. तिच्या आईने सांगितले आहे की, मुलीवर चार जणांनी सामूहिक लैगिंक शोषण केले, तिला मोतिहारीच्या छटौनी येथे सोडून दिले. जिथून मुलगी घाबरून घरी परतलीच नाही. तिथून मुलगी तुरकौलियाला तिच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी निघून गेली. पण तुर्कौलियाला पोहोचल्यावर तिचा रस्ता चुकला. त्यादरम्यान तिला एका महिलेची भेट झाली, आणि त्या महिलेला संपूर्ण घटनेची माहिती दिला. तेव्हापासून ती त्याच महिलेसोबत राहत होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीचा जबाब न्यायालयात नोंदवला आहे. याशिवाय त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे. ती मोतिहारी नगर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. 16 जून रोजी ती कुरकुरे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. या प्रकरणी चार तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप असून पोलिसांनी तिघांना अटक केली.
22 जून रोजी पोलिसांनी मुफसि पोलिस स्टेशनच्या धनोटी नदीतून एक मृतदेह ताब्यात घेतला होता, जो त्याच मुलीचा असल्याचे सांगण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणाचा मृतदेह सापडला? पीडित महिला महिनाभर अज्ञात व्यक्तीच्या घरी कशी राहत होती? अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कारादरम्यान मृत्यू झाला आणि मृतदेह गोणीत ठेवून धनोटी नदीत फेकून दिल्याचे वक्तव्य अटक आरोपींनी का केले? आता पोलिसांच्या पुढील तपासात हे उघड होईल.